Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

करमाळा तालुक्यातील विकासाकडे लक्ष देणारा राजकारणातील कोहिनूर हिरा हरपला.....

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*



महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  कैलासवासी अजितदादा पवार यांचे नुकतेच बारामती येथे विमान अपघातात निधन झाले निधनाची बातमी करमाळा शहर तसेच तालुक्यामध्ये पसरताच दादा वर प्रेम असणाऱ्या नेत्यावर तसेच कार्यकर्त्यावर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला दादांचे प्रेम हे करमाळा तालुक्यावर होते दादांचा दौरा म्हणजे कार्यकर्त्यांना एक प्रकारे आपल्या कामाची पर्वणी होती दादा कधीही करमाळा किंवा करमाळा तालुक्यामध्ये कोणत्याही शासकीय कार्यक्रम असो किंवा खाजगी कार्यक्रम असो कार्यकर्त्यांचे नियमित विचारपूस करीत असे दादा हे आपले कार्य करीत असताना कधीही त्यांनी तो या पक्षाचा आहे किंवा दुसऱ्या पक्षाचा आहे असे कधीच मनात आणले नाही 24 तास आपले काम करणे हेच दादांचे ध्येय होते एखादे काम होत असेल तर दादा निश्चित ते काम करणार  होत नसेल तर ते नाही होणार असे सांगत होते राज्यात पूरग्रस्त परिस्थिती असताना दादांनी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोर्टी तसेच संगोबा परिसरातील पूरग्रस्ताची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले होते दादांचे तसेच करमाळा तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांचे संबंध हे जिव्हाळ्याचे तसेच चांगले होते दादा म्हणजे करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत होते करमाळा तालुक्यातील कोणत्याही पक्षाचा नेता अगर सामान्य कार्यकर्ता आपल्या कामकाजासाठी मुंबई येथे मंत्रालय दरबारी गेला तरी दादा त्यांची अस्थिवायिकपणे चौकशी करून त्यांचे काम तडीस नेत होते आमदार नारायण आबा पाटील, करमाळा नगरीच्या नगराध्यक्षा सौ मोहिनी सावंत, माजी आमदार संजय मामा शिंदे, तसेच माजी आमदार जयंतराव जगताप, युवा नेते दिग्विजय बागल, युवा नेत्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा रश्मी बागल, यांनी देखील दादांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आपले दुःख व्यक्त केले दादांचे अपघाती निधन करमाळा शहर तालुक्यामध्ये येऊन धडकताच तालुक्यातील नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शब्द देखील अपुरे पडले काही नेत्यांचा कंठ दाटून आला दादांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली अनेक कार्यकर्ते भावना विवश झाले महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील कोहिनूर हिरा हरपल्याचे दुःख करमाळा तालुक्यातील सामान्य कार्यकर्ता ते दिग्गज नेते यांना एक प्रकारे दुःख अनावर झाले.                                    



 आपल्यातल्याच एक कुटुंबातील कुटुंब प्रमुख हरपला असल्याचे दुःख कार्यकर्त्यांना जाणवले दादांच्या जाण्याने करमाळा शहर तालुकाच नव्हे तर संपूर्ण राज्यात एक प्रकारे पोकळी निर्माण झाली आहे दादा गेले आता आपले कसे होणार या दुखात आजही करमाळा शहर तालुक्यातील कार्यकर्ते शोक सागरात बुडालेले पहावयास मिळत आहे दादांना श्रद्धांजली म्हणून करमाळा शहर व तालुक्यातील अनेक मोठी गावे दादांना श्रद्धांजली म्हणून बंद ठेवण्यात आली


शब्दांकन,,,,,, 

 अलीम शेख पत्रकार 

 करमाळा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर 98 50 68 63 60


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा