*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
राज्याचे संवेदनशील आणि जनतेच्या मनात विशेष स्थान असलेले उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आध्यात्मिक गुरू, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक तथा जागतिक शांततेचे संदेशवाहक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे व्हिडिओ कॉलद्वारे आशीर्वाद घेतले.
या संवादादरम्यान गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी एकनाथरावजी शिंदे साहेबांना राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, जनसेवेसाठी तसेच सामाजिक सलोखा, शांतता आणि सकारात्मकतेच्या मार्गावर कार्य करण्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. यावेळी राज्यातील जनतेचे कल्याण, सामाजिक एकोपा, युवा पिढीचे मार्गदर्शन तसेच नैतिक मूल्यांवर आधारित नेतृत्व या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गुरुदेवांचे आशीर्वाद हे आपल्या सार्वजनिक जीवनातील प्रेरणास्थान असल्याचे सांगत, आध्यात्मिक शक्ती आणि सकारात्मक विचारांमुळे प्रशासनाला अधिक बळ मिळते, अशी भावना व्यक्त केली. त्यांनी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमार्फत देश-विदेशात सुरू असलेल्या ध्यान, योग, तणावमुक्त जीवन, मानवी मूल्ये आणि शांततेसाठीच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
जगभरात कोट्यवधी लोकांना योग, ध्यान व मानवतावादी विचारांशी जोडणारे गुरुदेव श्री श्री रविशंकर हे अध्यात्मिक क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांचे कार्य केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न राहता सामाजिक समरसता, नैसर्गिक आपत्ती निवारण, युवक सक्षमीकरण आणि जागतिक शांततेसाठीही महत्त्वपूर्ण ठरले आहे.
या व्हिडिओ कॉलद्वारे झालेला हा स्नेहसंवाद राज्यातील राजकीय नेतृत्व आणि अध्यात्मिक विचारधारेतील समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरला असून, सकारात्मक ऊर्जा व जनहिताच्या कार्यासाठी नवी प्रेरणा देणारा क्षण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा