Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ जानेवारी, २०२६

“*कारगिल गौरव अवॉर्ड २०२५मध्ये* *आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा गौरव*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


भारतीय लष्कर व सरहद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “Sarhad Shauryathon 2025 – Kargil Vijay Diwas” अंतर्गत “कारगिल गौरव अवॉर्ड २०२५” सोहळा आज पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

या गौरव सोहळ्यात सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना लडाखचे राज्यपाल मा. कविंदर गुप्ता यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल युद्धातील शौर्य, देशभक्ती व बलिदानाची आठवण जपण्यासाठी तसेच देशासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी कारगिल गौरव अवॉर्ड प्रदान केला जातो.

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय मदत, मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, आर्थिक सहाय्य, उपचारासाठी मार्गदर्शन तसेच सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यपाल मा. कविंदर गुप्ता यांनी आपल्या भाषणात मंगेश चिवटे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत, समाजासाठी कार्य करणाऱ्या अशा आरोग्यदूतांची देशाला नितांत गरज असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सरहद, पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून डॉ. शैलेश पगारिया (अरहॅम फाउंडेशन), संजीव शाह (सुहाना फाउंडेशन) व संजय नहार (सरहद, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

हा सन्मान केवळ मंगेश चिवटे यांच्यासाठीच नव्हे, तर समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व सेवाभावी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा