डॉ. सलीम शाहिदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना
श्रीरामपूर
मोबाईल :- 9271640014.
पैगंबर मुहम्मद स्व.चे सहकारी, अबु हुरेरा (रजि )सांगतात ,"!! रोजा एक प्रकारे गुन्हा न करण्याची ढाल आहेत,"!!
रोजाच्या स्थितीत तुम्ही कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी, गुन्हा करुच शकत नाही, ; गुन्हां - अपराध करण्याचे विचार सुध्दा करु शकत नाही, तुमच्या बरोबर भांडणं - अपशब्द वापरत असेल तर, त्या व्यक्तीस सरळ सांगा , " मै - रोजे- से - हुं "( मला उपवास आहेत,) तर समोरील व्यक्ती अपशब्द- भांडण करणारा गुन्हा करणार नाहीत, हे जाणून ही त्याने अपशब्द वापरले तर ; ती व्यक्ती फार मोठ्या पापांचे भागिदार होईल."( हादिस : सहीह बुखारी हा.न.१८९४).
जीवन ईश्वराचे सर्वश्रेष्ठ वरदान आहे. जीवनाचा प्रत्येक क्षन अमूल्य आहे. गेलेला क्षण कोणत्याही परस्थिती पुन्हा कधीच मिळणार नाही. म्हणून प्रत्येक क्षण जगता आला पाहिजेत. प्रत्येक मनाव हा अल्लाह ईश्वरराचा प्रतिनिधित्व करतो. निर्मिक (अल्लाह ईश्वर )नें सृष्टीतील प्रत्येक अनु रेणूला देखील अस्तिव दिलं आहे. प्रत्येक अनु रेणू हा महत्वाचं आहेत.प्रत्येकाला काही नां काही उद्देश दिलेलं आहेत. ते एका विशिष्ट तत्वावर कार्यरत आहेत.
दिव्य कुर आन म्हणतं, " आम्ही मानवाला उत्तम आकार देवून निर्माण केलेले आहेत. "त्याला चांगले वाईट समजण्या साठी त्याला बुद्धी दिली, चांगलं वाईट पारखण्यासाठी क्षमता त्याच्या स्वभावात अंतर्भुत दिली,, त्याला आचार विचार करण्याचे स्वातंत्र्य दिलं, "
जीवनरूपी विवेक बुद्धी ची परीक्षा आहेत की तो कोणता मार्ग स्वीकारतो. त्यासाठीच त्याला आम्ही मार्गदर्शनांची व्यवस्था दिव्य कुरआन हा ईश्वरी ग्रंथ पाठवून व प्रेषित पैगंबर च्या माध्यमातून त्यांच्या सफलतेसाठी सदाचार करण्यासाठी मार्गदर्शन मार्गदर्शक करण्यासाठी पाठवलं. जीवन सफल व्होवं म्हणून संपूर्ण व्यवस्था केली. हें त्यासाठी की या सर्व मार्गदर्शनाच्या प्रकाशात त्यानं प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या क्षमता व प्रतिभांचा सर्वत्कृस्ट उपयोग करून जीवन सफल करावं.
नकळतपणे जें चरस -गांजा -अफू - च्या आहारी गेलेले असतील, दारु पिऊन पडत असतील किंवा अनेक व्यसनांच्या आहारी गेलेले, व्यसनाधीन ,त्यांच्यामुळे घरात त्रस्त झालेल्या ,घरांची पैशाची राखरांगोळी केलेली - असेल, आशा बांधवांना, मित्रांना,रमजान महीना एक संधीच काळ चालून आलेला. कुठल्याही खर्चाची गरज नाही, कुठल्याही मोटीवहेशनल लिडर- - संमोहन तज्ञांची मदती शिवाय जडलेल्या घाणेरड्या व्यसनं सोडण्याची सुवर्ण संधी सध्या आलेली आहेत. मनापासून विचार करून इच्छा शक्ती निर्माण करण्याची .फक्त एकदा विचार करा . मनोमन तय्यार व्हा...आज संधी उपलब्ध आहेत .
रमजान महिन्यातील अनिवार्य (फर्जं) केलेले पवित्र रोजे (उपवास) आहेत. अल्लाह ( ईश्वर- भगवंत) ला संपूर्णपणे शरण जाणे, नितांत निष्ठा ठेउन सदाचाराने वागण्याची शपथ .त्यात एक चांगले काम हीं करू शकतात की आहारी गेलेल्याजवळच्या मित्रांला या चांगल्या उपक्रमात सहभागी होण्यास आमंत्रित करू शकतात, कारण अल्लाह (ईश्वर- परमेश्वर) हा कोणत्याही एका राष्ट्राचा किंवा धर्माचा नसुन , तो सर्व व्यापी सर्व जगाचा रब्बुल आलमीन आहेत,
दिव्य कुरआन, ( सुरहा नं01 अल - फातिहा मध्ये), " जो सर्व सृष्टीचा पालनकर्ता आहे. "रुब आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांनीं, " पसायदान " मध्ये, "विश्वात्मक"असेच म्हणावे लागते, संपूर्ण सृष्टीचा एकच रब( पालणकर्ता - भगवंत )आहे. हाच (ईश्वर) अल्लाह सृष्टीच्या आणि सृष्टीतील सर्व कणां- कणांचा निर्माता- नियंता आहे.
जर पुन्हा नकळत व्यसनांची आठवणी जाग्या झाल्या असतील तरी पुन्हा वर्ष भर तुम्हाला आठवड्यातून दोन - तीन वेळा नफील( फायद्यासाठी ) रोजे ठेऊ शकतात. बारा महिने विविध कारणांनी रोजे करत असतात . नफिल रोजे करण्याची पद्धत आहे . प्रेषीत मुहम्मद स्व.स्वतः सोमवारचा व गुरुवार व महीन्याच्या १४-१५-१६ तारखेलाही रोजा ठेवत. मुहर्रम च्या ९ वा, १० वा दिवस किंवा १० व ११ व्या दिवशी ज्याला " यौमें आशुराहा " चे रोजा आहे. काही बंधू एक दिवसाआड ही रोजा करतात.
नवसाचे हें रोजे असते, "नवस" व्यक्त करतात , नवस पुर्ण झाले तर दोन - चार - दहा रोजे करून सत्कार्य करू, आपल्या इच्छेप्रमाणे मागणी करण्याची पध्दत आहे.
काही कळत - नकळतपणे चुका झाल्या असतील, चुकांच्या प्रायश्चित्त म्हणून किंवा स्वतः आत्मक्लेश म्हणून ही रोजा ठेवण्या बरोबरच सदका (दान) गोरगरिबांना अन्न दान ,आर्थिक दान देण्याची.
जीवनरूपी हीं परीक्षा त्याच्या विवेकबुद्धीची परीक्षा आहेत की तो सत्यमार्ग स्वीकारतो की वाम मार्ग.??. या सर्व मार्गदर्शन केलेल्या प्रकाशात सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये संपूर्ण विचार करून जी व्यक्ती स्वतःला, त्याच्या निर्मिकला आणि जीवनाच्या महान उद्देशाला ओळखुन त्यानुसार आपल्या क्षमता व प्रतिभांचा सदुपयोग करते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने जीवनाचा उद्देश सार्थ करते.
तर अल्लाह ( परमेश्वर - भगवंत ) ला सृष्टीतील प्रत्येक मानाव महत्वाचं आहे. म्हणून वाईट आचार विचार , राग - लोभ - मत्सर - अहंकार - मानसिकता याचं पुर्ण निर्मूलन करून जीवन सफल करावं.
नाहीं तर, " आणि त्या दिवशी ( कायमत - प्रलंयच्या- न्यायाच्या ) तुम्हाला दिलेल्या देणग्या बद्दल विचारले जाईल की, त्या (ईश्वर) अल्लाह च्या कृपा होत्या " काय केलं. ( दिव्य कुरआन 102 :8,).काय उत्तर द्याल.
(मित्रांनो लेख आवडला तर मित्रांनां- नातेवाईकांना जरूर पाठवा, प्रतिक्रिया अवश्य कळवा.)
"इस्लाम समजून घेताना "
लेखन :- डॉ. सलीम शाहिदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना
श्रीरामपूर
जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर,)
मोबाईल :- 9271640014.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा