*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
शनिवार दिं ०८/०२/२०२६/सोमवार दि-९/२/२६ मंगळवार दि.१०/२/२६ मंगळवार दि.२४/२/२६ रोजी रात्रीच्या सुमारास मौजे माळखांबी ग्रामपंचायत हददीमध्ये शेतकऱ्याच्या विहिर, बोअर, सोलार पॅनल वरिल तांब्याच्या केबल चोरीबाबत व त्याचे रितसर पंचनामे झाले असून चोरीस गेलेल्या वस्तूंच्या रकमेचा उल्लेख ज्या पटीत किंवा प्रमाणात व्हायला पाहिजे तो झाला नसून चोरी करणाऱ्या चोरांना शोधून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई अशी मागणी माळखांबी येथील अनेक शेतकऱ्यांनी अकलूज पोलिसांकडे केली असून अद्याप त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे सर्वच शेतकरी अद्याप दहशती मध्ये आणि चिंताग्रस्त असून तातडीने चोरांचा शोध घेऊन त्यांच्या कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत माळखांबी येथील शेतकऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास निवेदन करण्यात येते कि, दिं ०८/०२/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास मौजे माळखांबी ग्रामपंचायत हृददीमध्ये शेतकऱ्याच्या विहिर, बोअर, सोलार पॅनलं, वरिल तांब्याच्या केबल चोऱ्या मोठ्या प्रमाणात गेल्या २ वर्षापासुन मोठ्या प्रमाणात होत आहेत.
शेतकरी सध्या अतिवृष्ठी व नैसर्गिक अशा अनेक अडचणीला सदयस्थितीला सामोरे जात आहे. अशा मध्ये तांब्याच्या केबल चोऱ्या मोठ्या प्रमाणात दर ३ ते ४ महिन्याला चोरीला जात आहेत. शेतकरी पुर्णतः हतबल झालेला आहे. मागील वेळेस मोटर चोरीस गेल्या तसेच केबलही गेल्या, आणि आत्ता पुन्हा अजुन विहिर, बोअर, सोलार पॅनल वरिल तांब्याच्या केबल चोरी गेल्या आहेत. चोरी करणाऱ्या चोराची खाशीयत पण इतकी विचित्र आहे कि. केबल चोरी केल्यानंतर केबल विहिरीत टाकणे, बोअरमध्ये टाकणे, त्यामुळे शेतकऱ्याच्या खर्चात अजुन भर पडत आहे.
तरी आपणास विंनती करण्यात येते कि माळखांबी ग्रामपंचायत हददीमध्ये ज्या शेतकऱ्याच्या विहिर, बोअर, सोलार पॅनल वरिल तांब्याच्या केबल चोरी गेलेली आहे. त्यां चोरांवर कारवाई करावी तसेच गावामध्ये मागील काही दिवसापासून चोरांनी परत गावामध्ये चोरांच धुमाकूळ घातला
असुन त्यामधील धक्काधायक खुलासे आपणासमोर माडण्यात येत आहेत
माळखाबी गावामधील शेतकरी शेखर भास्कर गमे हे मोटार रिवायडिंग चा व्यवसाय करतात. त्यांच्या वस्तीवरही चोरीचा प्रकार झाला असून त्या अगोदर त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेली माहिती अशी कि
दि. ०७/०२/२०२६ रोजी रात्री प्रथम त्यांच्या शेळया चोरीला गेल्या लगेच दि ०९/०२/२०२६ शेतीतील २०० फुट तांब्याची केबल, गॅस, शेगडी लायटर, शेतातील शेतमाल मोजायचा इलेट्रिक वजन काटा १२५ किलो ताब्याची तार, यावर चोर समाधानी झाले नाहीत. त्यानी चारीचा तिसरा प्रयत्न दि. १०/०२/२०२६ रोजी रात्री केला रानातील वस्ती असल्याने शेखर भास्कर गमे आणि त्याचे कुटुबिय रोज रात्र भर जागुन काढत आहेत आता प्रश्न उपस्थित होत आहे कि, यानी पोलीसाकडे तक्रार केली मात्र त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही पंचनामा न होता आमचा तपास चालु आहे. अशी उत्तरे ऐकायला मिळत आहेत. शेतीतील राहती वस्ती असल्याने सदर कुटुब प्रचंड दहशतीमध्ये आहे.
आत्तापर्यंत कमीत कमी १०० शेतकऱ्याच्या शेतातील ताब्याच्या केबल चोरीला गेल्या
अशा शेतकऱ्याच्या रितसर पंचनामे करून चोरांना शोधुन योग्य ती कायदेशिर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा दयावा. अशी मागणी मळखांबी परिसरातील शेतकऱ्यां कडून होत असून या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
माहितीस्तव
१) पोलीस उपअधिक्षकसो
उपविभागीय पोलीस कार्यालय, अकलुज.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा