Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

करमाळा येथील विधीज्ञ एडवोकेट महादेव कदम यांचे लैंगिक अत्याचार, रॅगिंग आणि प्रतिबंध विषयावर माळेवाडी अकलूज येथे जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालय माळेवाडी अकलूज येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात ॲड. महादेव कदम यांनी लैंगिक अत्याचार आणि त्यावरील प्रतिबंध तसेच रॅगिंग आणि प्रतिबंध या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य मा.डॉ.जयश्री धुमाळ, प्रा.डॉ.तोरणे,प्रा. दीपक पवार, प्रा. डॉ.मंदाकिनी देवकर, प्रा.उज्वला हेगडे हे उपस्थित होते. त्याप्रसंगी ॲड.महादेव कदम यांनी विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण तयार करणे हा उद्देश समोर ठेवून
आपल्या भाषणात त्यांनी लैंगिक अत्याचाराची संकल्पना स्पष्ट करताना कार्यस्थळावरील महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013 या कायद्याची माहिती दिली. या कायद्यांतर्गत अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापनेचे महत्त्व, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि पीडितांना मिळणारे कायदेशीर संरक्षण याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.




तसेच विद्यार्थ्यांमधील रॅगिंग ही गंभीर समस्या असल्याचे सांगून त्यांनी University Grants Commission (UGC) च्या नियमांनुसार रॅगिंग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली. रॅगिंग ही केवळ शिस्तभंगाची बाब नसून ती दंडनीय गुन्हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित शिक्षण संस्थांनी रॅगिंगविरोधी समिती स्थापन करून तक्रारींवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. कदम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अधिकारांबरोबरच कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. “भीती न बाळगता अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच खरी प्रतिबंधाची सुरुवात आहे,” असे ते म्हणाले.




कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता निर्माण झाली असून सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असा संदेश देण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा देशमुख यांनी केले तर प्रस्ताविक प्राध्यापक हेगडे मॅडम यांनी केले त्याचप्रमाणे निहाल गिरमे आणि आरती गोसावी या विद्यार्थ्यांनी आपले अभिप्राय नोंदविले त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर धुमाळ मॅडम यांचे अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर प्रा.डॉ.देवकर मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा