Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

रमजान मुबारक 2026 रोजा नं. 11वा, रवीवार दिनांक 01-03-2026 !!! जशी तुमचे कर्म कृत्य, तसेच तुम्हाला फळ दिलं जाईल " दिव्य कुरआन.

 डॉक्टर सलीम शाहिदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी  दवाखाना 

श्रीरामपूर 

श्रीरामपूर.. जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर )

9271640014



प्रेषित मुहम्मद स्व. नी कथन  , " रमजान महिण्यात तीन विविध विभाग त्यालाच  आशराहा  म्हटलं जातं , ज्यामध्ये पहिला (1)  " रहमत "(2) दुसरा " मगफिरात "आणि (3)तिसरा विभाग हा " जहाँनम से आझादी ( नरकात भडकत्या आगीत सुरक्षता ).

 रमजान मुबारक चे 11 रोजे पूर्णतःवास जात आहेत,  गाफिल व निष्काळजी आहोत,    खुशाल संधीची वाट लावत आहोत, पहिले दहा रोज़े हें "रहमत " अर्थातच "दया " करणारा, अल्लाह हें  दया करणारे आहेत, आपल्या  दिवस भरात किती  न कळत अशा गोष्टी होत असतात ज्याचं अपल्याला  गुमान ही नसतं. उदाहरण  पुष्कळ देता येतील चालता चालता कोणाला तरी न कळत शिवी , व्यवहार करताना खोटे शपथ खाऊन माल विकतात किंवा घेतात अर्थातच कोणाला तरी फसवूनच  व्यवहार चालतात, भाजीवाला वारंवार भाजीवर ताजी दिसावी म्हणून पाणी मारून ताजी आहेत म्हणून विकतात, पैसे डुबवलं जातात, खोटे बोलून घरी बसले जाते, देणं घेणं खोटे बोलून टाळलं जातं,  असंख्य गोष्टी कळत न कळत केलं जातं, वारंवार खोटे बोललं जातंय,दोस्ता, वडिल,  आपल्या बॉस बरोबर, असं असंख्य उदाहरण देता  येथील,    मनात रुख -रुख असतं,  रमजान मध्ये वारंवार अल्लाह(  ईश्वरा,- भगवंत,) कृपा -दया - रहमत राहावीत- हवी  यासाठीच अल्लाह शी वारंवार माफी मागितली पाहिजे,  तसेच वारंवार जाणीवपूर्वक व नकळत होणाऱ्या  चुका पुन्हा कधी  होणार नाहीं याची अल्लाह शी गवाही,-साक्ष दिली पाहिजेत. अल्लाह हा दायवंत,- कृपावंत- कृपाळू ही आहेत. अल्लाह ( परमेश्वर )आपल्या बंद्यावर आई सारखं चं सत्तर आई पेक्षा जास्त प्रेम करत असतो



वारंवार माफी मागत चला, ज्याच्याशी तुम्हीं चुकीनें वागलात, बोललात, चुकीचे व्यवहार केलेत त्या सर्वांशी पुन्हा - वारंवार माफी मागा अल्लाह एवढा दयावान आहेत तर आपल्या समोरील व्यापारी, आई, बाबा, मित्र,नातेवाईक,ज्यांच्या -ज्यांच्या बरोबर चुकीचं वक्तव्य केलं तो तर मनुष्य आहेत.. चुका या माणसा कडूनच होतं असतात. जगात फक्त्त चुका  फारिस्ते करीत नसतात, मनुष्य प्राणी हा वारंवार चुका करणारा आहेत म्हणून  राहमत साठी दुवा प्रार्थना करा.  रामजानुल मुबारक चा या पवित्र महिना अल्लाह चा आवडता महिना आहेत, जास्तीच जास्त चुका माफ होण्याचा  संधीचा पवित्र महिना आहेत.

              प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात, "  रमजान महिन्यात काही गोष्टी वारंवार कराव्यात, (1) वारंवार अल्लाह ( परमेश्वर ) एक आहेत व प्रेषित मुहम्मद स्व, अल्लाह चे अंतिम प्रेषित- पैगंबर, संदेशष्टा (संदेश वाहक )आहेत.

अर्थातच ला ई लहा ईललिल्लाह मुहम्मद दूर रसूललिल्लाह स्व.

अल्लाह ( ईश्वर- भगवंत ) चे नामस्मरण - चिंतन जेवढे शक्य आहेत तेवढं करणं.16

(2) इस्तीगफार (आपण केलेल्या भूतकाळातील चुकांची माफी वारंवार मांगने ), 

(3)जन्नत तुल फिरदोस  ची इच्छा व्यक्त करणं (  परलौकिक जीवनानंतर स्वर्गातील चांगल्या जागेची इच्छा ).

(4) दोजख कें आग से पन्हा ( मारणोत्तर परलौकिक जीवनात नरकातील अगी पासून  स्वरक्षण ).

    बहुतेक बंधूना उपासना मागचा उद्देशच माहित नससो.  बंधू भगिनी  आजूबाजूला, शेजारी करतात म्हणून करीत असतात, उपवास रोजा चे काहीतरी उद्देश हा असतो. कोणत्याही गोष्टी या काहीतरी उद्देशानेच ठरवून त्या अभिप्रेत असतात. त्या समजूनच केल्या पाहिजेत. असो.

  रोजे ठेवण्याचा उद्देश विचारलं तर,फारच थोडया लोकांना व्यवस्थित उत्तर देता यईल म्हणून सर्व रोजदारांनी आपलं उदीष्ट काय आहेत हें माहित करून उपासना केली तर किती योग्य राहील, अल्लाह  राजी होईल होतील.. म्हणून या, "रहमत" तर गेला आता पुढील 11-20 दिवस हें मगफिरत म्हणजे अल्लाह ( परमेश्वर ) रा कडून माफी मागून माफी मिळवून घेण्याचे आहेत. 

उद्या पासून " मगफिरात " चा अशरहा ( विभाग ) चालू होणार आपण केलेल्या चुकांची माफी मागायची... 

             दिव्य कुर आन मध्ये अल्लाह स्पष्ट सांगतात, "" तुम्हीं सहनशिलता दाखवा किंवा दाखवू नका त्याने काहीही होणार नाहीं, तुम्हाला तसाच मोबदला दिला जाईल, जशी तुम्हीं कृत्य करीत होता " सुरहा नं 52,अत- तुर आ. नं. 16 ). 

         दिव्य कुरआन मध्ये अल्लाह सांगतात, " पण (इशभीरू) अल्लाह ची जाण ठेवून जीवन जगलेले इसम त्या दिवशी ऐश्वरय संपन्न अशा महालात असतील. ' सुरहा 52 अत -तुर आ नं. 17.).

समस्त जगातील शांती - बंधुता व एकता  टिकावं म्हणून  आपल्या दुवा मध्ये सामील करा. निच्छितच जगातील शांती एकता जगासाठी फार महत्वाची आहेत..

(मित्रांनो लेख आवडला तर  मित्र व नातेवाईकांना पाठवा, त्यांना हीं फायदा होईल... प्रतिक्रिया अवश्य कळवा 🙏)

" इस्लाम समजून घेताना "

' माणसं जोडली पाहिजेत "



लेखक :- डॉक्टर सलीम शाहिदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी  दवाखाना 

श्रीरामपूर 

श्रीरामपूर.. जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर )

9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा