Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

*इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूल मध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा*

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक मो. 9922419159



इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूल मध्ये मराठी भाषा दिन मोठ्या जल्लोषात व उत्साहात संपन्न झाला.

यानिमित्त शाळेत प्रवेशद्वारापासून ते सभागृहापर्यंत मराठी सुविचार, म्हणी, संत वाणी आणि मराठी साहित्यिकांच्या विचारांनी सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसत होता.

या कार्यक्रमासाठी के १२ टेक्नो सर्व्हिसेस यांच्या अकॅडमिक मॅनेजर श्रीविद्या

वरदराजन मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा आणि दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचा संदेश दिला.



कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करून करण्यात आली. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे, आपल्या विचारांची अभिव्यक्ती आहे आणि आपल्या अस्मितेचा आधार आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.ल



राजश्री पाटील मॅडम आणि अलका ननवरे मॅडम यांनी मराठी भाषेचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदान प्रभावी शब्दांत विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांनी संत साहित्य, शिवकालीन इतिहास, तसेच आधुनिक मराठी साहित्य यांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांनीही मराठी भाषेविषयी आपले विचार आत्मविश्वासाने व्यक्त केले.

इयत्ता पहिली आणि दुसरी मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठी गीते, चारोळ्या आणि छोटेखानी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवम बोराडे, मिताली गार्डे आणि अनुष्का क्षीरसागर यांनी सुंदर आणि प्रभावी भाषणे सादर केली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांनी मराठीतून गोष्ट सांगून आपल्या कल्पनाशक्तीची झलक दाखवली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच “रसना चव” या विषयावर विद्यार्थ्यांनी मराठीतून सादरीकरण करत भाषेचा गोडवा आणि अभिव्यक्तीची ताकद दाखवून दिली.

शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त अंगद शहा आणि सौ. रुचिरा अंगद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा