Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

इंदापूर शहरासाठी स्वच्छ, सुंदर, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात सर्वोच्च प्राधान्य : नगराध्यक्ष भरतशेठ शहा. इंदापूर नगरपरिषदेचा कोणतीही करवाढ नसलेला आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प मंजूर. इंदापूर शहरास शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तरंगवाडी तलावातील पाण्याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष : विरोधी पक्षनेता अनिल पवार

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक मो. 9922419159




इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात नगराध्यक्ष  भरतशेठ शहा यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ फेब्रुवारी रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत कोणतीही करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष  भरतशेठ शहा, नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यासह सर्व नूतन नगरसेवक,  नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नगराध्यक्ष भरतशेठ शहा म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता व आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास, हरित उपक्रम डिजिटल प्रशासन, उत्पन्नवाढ यास अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. 

यावेळी मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी, अपेक्षीत उत्पन्न स्त्रोत व विकास कामांचे नियोजन या बाबत सविस्तर माहिती दिली.

इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पासह सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. कोणतीही कर वाढ नसलेला  ७४,७२,६८६ रुपये शिलकेचा अर्थसंकल्प यावेळी मंजूर करण्यात आला.

यामध्ये मागील वर्षाची शिल्लक  १,१७,५४,०८६ रुपये असून सन २०२६-२७ मध्ये अंदाजे महसूली व भांडवली जमा  १७८,४९,४५,००० रुपये अपेक्षित जमा धरण्यात आली आहे.  महसूली व भांडवली खर्च रुपये १७८,९२,२६,४०० अपेक्षित धरण्यात आला आहे. 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत इंदापूर शहरासाठी नवीन भुयारी गटार योजना तसेच रस्ते प्रकल्प योजना मंजूर असून, त्या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. नगरपरिषदेचा स्वहिस्सा या अनुषंगाने निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली असून यात नियमा नुसार महिला बालकल्याण, दिव्यांग, दुर्बल घटक, तसेच क्रीडा महोत्सव यासाठी विशेष राखीव निधीची तरतूद केली आहे.

 घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे, संगणकीकरण यासह नागरी सुविधा केंद्र अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने तसेच शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेऊन, प्रस्तावित शहर विकास आराखडा विचारात घेऊन नवीन रस्ते, नगरपरिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारती साठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

सदर सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सर्व सदस्यांनी सविस्तर चर्चेनंतर मांडण्यात आलेल्या तरतुदी व शिफारशीसह सर्वानुमते मंजूर केला. शहराच्या नियोजनबध्द पारदर्शक व सर्वागीण विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासाचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन शहराचा विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान विरोधी पक्ष नेते अनिल पवार म्हणाले, इंदापूर शहरास पूर्वी तरंगवाडी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. हे खडकवासला, वीर भाटघर धरणाचे पाणी शुद्ध, प्रदूषण मुक्त असल्याने या पाण्या साठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. मालमत्ता थकबाकी वरील व्याज व शास्ती यावर कोणतीही सवलत देण्यात आली नाही. यासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी नगरपरिषद निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप त्यांनी केला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा