*अकलूज प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
मौजे कोळगाव ता. माळशिरस येथे आज शिव - कीर्ती युवा मंच शाखा कोळेगाव यांच्यावतीने अकलूज नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळा कोळेगाव येथे शिव कीर्ती युवा मंच शाखा कोळेगाव यांच्या वतीने खाऊ वाटप करून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा संपन्न झाला
य कार्यक्रमासाठी शिवसृष्टी मल्टीमीडिया लेझर शोचे संचालक धनंजय (भाऊ) दुपडे, व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सावंत पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना नितीन सावंत म्हणाले की शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणजे सामाजिक, शैक्षणिक ,आणि उद्योग क्षेत्रात चांगले काम करणारे नेतृत्व असून शिवबाबा त्यांनी कमी वयामध्ये अनेक संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करताना त्यांनी अकलूज नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पर्यंत चांगलं काम करत आहेत
त्या प्रसंगी नितीन सावंत यांनी शिव बाबांना पुढील वाटचालीसाठी उदंड आयुष्य व अनंत शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पिलीव गावचे युवक सोहेल बागवान तसेच शिवकीर्ती युवा मंच शाखा कोळेगावचे अध्यक्ष सुभाष बंदपट्टे, दत्तात्रय गेजगे, रानोबा पारसे, संतोष धांडोरे शाळेमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कोळेगाव मधील समस्त ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा