*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमळा शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंत गटाने साकडे घातले असुन विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी निधीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपालिकेच्या विविध अडचणी पूर्ण करण्याच्या संदर्भात करमाळा शहराच्या इतिहास रचणाऱ्या सावंत गटाने नगरसेवकाच्या शिष्ट मंडळाद्वारे मागणीचे निवेदन दिले. यावेळी सावंत गटाचे युवा नेते सुनील सावंत, मराठा राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक रवींद्र जाधव, नगरसेवक प्रतिनिधी पैलवान दादासाहेब इंदलकर, अमोल परदेशी, विनोद महानवर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की करमाळा शहरातील अंतर्गत रस्त्याची फारच दुरवस्था झालेली आहे. जुना बायपास रस्ता, पुणे रस्त्यावरील काही ठिकाण, तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते होटकर पूल याबरोबरच शहरातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. संगम चौक ते पोथर नाका याबरोबरच जय महाराष्ट्र चौक ते डवरी गल्ली, खडकपुरा तसेच खंदक रोड, किल्ला वेस ते नागोबा मंदिर आदी रस्त्यांचा समावेश आहे .त्यांनाही मोठा निधी आवश्यक आहे. करमाळा शहरातील नागरिकांना उजनीत मुबलक पाणी असतानाही सातत्याने पाणीपुरवठ्याच्या सदोष यंत्रणेचा फटका बसत आहे. ही यंत्रणा सुधारण्यासाठी नगरुत्थान योजनेमधील या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळावी तसेच करमाळा शहरातील नऊ महापुरुषांच्या पुतळ्यासाठी त्यांच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा जेणेकरून या महा पुरुषांची प्रेरणा सर्वांना प्रेरणा देत राहील. त्याबरोबरच स्वच्छतेचा प्रश्नही करमाळावासीयांना भेडसावत आहे. आरोग्याचा विषय महत्त्वाचा असल्याने त्यासाठी लागणारे भुयारी गटार योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून त्याची शहरवासीयाच्या आरोग्याच्या दृष्टीने नितांत गरजेची आहे. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित सर्व योजनेला मंजुरी देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या निवेदनामध्ये केलेली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा