Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

पुणे येथे आरोग्यदूत विनोद भोसले यांना महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार प्रदान

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



समाजकार्य, जनसेवा तसेच वैद्यकीय मदत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आरोग्यदूत विनोद भोसले  यांना आज पत्रकार भवन,पुणे  येथे प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार ’ प्रदान करून गौरविण्यात आले. टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य व नालंदा विद्यापीठ यांच्या  वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात  श्री.नितीन ढवणे पाटील  राष्ट्रीय अध्यक्ष मराठी चित्रपट असोसिएशन, डॉक्टर नीता जोशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ ,व डॉ. दीपक दादाराव जाधव, संस्थापक अध्यक्ष टॅलेंटकट्टा  पुरस्कार वितरण समारंभात  यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान सोहळा पत्रकार भवन नवी पेठ पुणे  येथे अत्यंत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य व नालंदा विद्यापीठ कडून प्राप्त झालेल्या अधिकृत पत्रानुसार, आरोग्यदूत विनोद भोसले  यांना  समाजकार्य, जनसेवा आणि वैद्यकीय मदत क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.



गेल्या अनेक वर्षांपासून विनोद भोसले  हे सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. अपघात ग्रस्त रुग्णांना व  गरजू रुग्णांना उपचार, शस्त्रक्रिया तसेच आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोणताही भेदभाव न करता, निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा हीच आपली ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

विनोद भोसले यांना सोलापूर पोलीस अधीक्षक माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते मृत्युंजय दूत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

टॅलेंट कट्टा व नालंदा विद्यापीठ  वतीने पाठविण्यात आलेल्या आमंत्रण पत्रात नमूद केल्याप्रमाणे, आरोग्यदूत विनोद भोसले  यांचे कार्य संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार  ’ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज तो सन्मान प्रत्यक्षात येताच त्यांच्या लवंग गावात व  पंचक्रोशीत , सहकाऱ्यांमध्ये तसेच रुग्णसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पुरस्कार स्वीकारताना विनोद भोसले  यांनी हा सन्मान दिवंगत अजित पवार  यांच्या विचारांना समर्पित करत, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून माझ्यासोबत रुग्णसेवेत झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि प्रत्येक गरजू रुग्णाचा आहे,” अशी भावना व्यक्त केली.

या गौरवामुळे लवंग व माळशिरस  तालुकात  रुग्णसेवा व समाजकार्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा