Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

*शंकरनगर-अकलूज येथे महाशिवरात्र यात्रेचे निमित्त* कृषी व औद्योगिक आणि,पीक प्रदर्शन व स्पर्धा,दुग्ध स्पर्धा, जनावराचा बाजार,कुस्त्यांचा फड याचे आयोजन.

 *अकलूज --प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*



शंकरनगर-अकलूज येथील महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी महाशिवरात्र यात्रेचे दि. ११ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन केले आहे. यामध्ये महाशिवरात्र यात्रा,कृषी व औद्योगिक प्रदर्शन,पीक प्रदर्शन व स्पर्धा,दुग्ध स्पर्धा,जनावरांचा बाजार तसेच जंगी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

            या यात्रा नियोजनामध्ये बुधवार दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता यात्रा व प्रदर्शनाचे उ‌द्घाटन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका-स.म.शंकरराव मोहिते-पाटील स.सा.का.लि., शंकरनगर-अकलूज तसेच इतर मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा.पीक स्पर्धेमध्ये आलेल्या शेती मालाचे उत्कृष्ट नमुन्यांचे परीक्षकांकडून निरिक्षण व बक्षीसपात्र नमुन्यांची निवड तसेच दुपारी ४.०० वा. जातीवंत जनावरांची निवड होणार आहे.रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वा.महाशिवरात्री निमित्त श्रीशिवपार्वती अभिषेक व महापूजा विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील अध्यक्ष-ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर,शंकरनगर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते-पाटील या उभयतांचे शुभहस्ते आयोजित केली आहे. सदर दिवशी सकाळी ६.३० ते ७.०० या वेळेत दुग्ध स्पर्धेचे आयोजन केले असून यात्रेमध्ये होणा-या सर्व स्पर्धेतील विजेत्याना बक्षीस वाटप करणेचा कार्यक्रम सदर दिवशी सायं.५.०० वा.यात्रा ऑफिस समोर होणार आहे. सोमवार दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वा. मल्लांच्या जंगी कुस्त्यांच्या फडाचे उद्घाटन  विजयसिंह शंकरराव मोहिते- पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व कार्याध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, तसेच सयाजिराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील नगरसेवक नगरपरिषद अकलूज यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.

          या महाशिवरात्र यात्रेमध्ये लहान मुलांकरिता खेळणी स्टॉल, विविध पाळणे,अल्पोपाहार व रसपानगृह स्टॉल येणार असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात रेलचेल होणार असून यात्रा कालावधीमध्ये चोवीस तास पाणी,वीज,पर्यायी रस्ते तसेच आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व त्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

तसेच रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वा. यात्रा व पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांकरिता मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी व नागरिकांनी यात्रेचा व विविध प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन महाशिवरात्र यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा