Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

जेऊरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार ; कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा तालुक्यातील जेऊर  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.या अधिकाऱ्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा वेठीस धरली असून अशा विकृत वृत्तीच्या अधिकार्‍यावर आरोग्य विभागाने तात्काळ कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुयश कर्चे यांनी तालुका गटविकास अधिकारी यांना भेटून दिले आहे.

       निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की,जेऊर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रत्नदीप टोपे हे मागील चार ते पाच वर्षापासून कारभार पाहत आहेत.त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात अनेक रुग्ण,रुग्णांचे नातेवाईक, लोकप्रतिनिधी व आरोग्य कर्मचारी यांनी वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी निवेदने दिली आहेत.काही कर्मचारी तर यांच्या त्रासाला कंटाळून उपोषणाला बसले होते.

      या अधिकाऱ्याच्या गलथान कारभारामुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना चक्क खाली फरशीवर झोपवण्यात आले होते.डॉक्टर टोपे हे आरोग्य केंद्रातील ओपीडीला कधीच वेळेवर हजर नसतात.रुग्णांची हुज्जत घालतात.प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना इतरत्र पाठवतात.अशा अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल असून देखील आरोग्य विभाग डॉक्टर रत्नदीप टोपे यांना पाठीशी घालत आहे.

 आशा सेविका,आरोग्य कर्मचारी यांना जानेवारी महिन्यात तीन तास उभे करून यांनी मीटिंग घेतली होती.एवढेच नाही तर आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार यांनी रोखून धरला आहे. या आरोग्य केंद्रातील एका माजी कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 13 महिन्यापासून झाला नाही. सदर कर्मचारी धरणग्रस्त असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.   

तरी अशा अधिकाऱ्यावर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी सुयश कर्चे यांनी केले आहे.

 या निवेदनाच्या प्रती त्यांनी  जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य सचिव, आरोग्य मंत्री यांना पाठविल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा