*अकलूज- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या वार्षिक एसआरएमपी क्रीडा महोत्सवास अत्यंत उत्साहात सुरुवात झाली.या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू कु. समिक्षा अजय मानकुमरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.कु.समिक्षा यांनी ॲथलेटीक्स खेळ प्रकार, गोळाफेक,थाळीफेक तसेच वेटलिफ्टींग व पॅावरलिफ्टींग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक व रौप्य पदके विजेती ही खेळाडू अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात विविध वैयक्तिक व सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये गोळाफेक, थाळीफेक,धावणे या वैयक्तिक व कबड्डी,व्हॅालिबॅाल,रस्सीखेच व क्रिकेट या क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत
उद्घाटनपर भाषणाद्वारे कु. समिक्षा मानकुमरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना आपल्या शारिरीक तंदुरुस्तीसाठी व्यायामाचे महत्त्व,दैनिक आहाराचे व्यवस्थापन,दैनंदिन खेळाचा सराव, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक वातावरण या बाबींचे विद्यार्थींनीना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.अमित घाडगे यांनी देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या अकलूज येथील या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे कौतुक केले व त्यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यामागचे औचित्य स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा विभागाचे प्रा.अरविंद वाघमोडे यांनी केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख डॅा.छाया भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.याप्रसंगी महाविद्यालयातील डॅा.भारती भोसले,डॅा.जयशीला मनोहर,डॅा. राजश्री निंभोरकर उपस्थित होत्या.उद्घाटन समारंभानंतर गोळाफेक,थाळीफेक व धावण्याच्या स्पर्धा यामध्ये विद्यार्थीनींनी उत्साहात सहभाग नोंदविला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा