Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

*अकलूज येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयात महाशिवरात्री विविध कार्यक्रमाने साजरी.*

 *अकलूज- प्रतिनिधी* 

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



संग्रामनगर-अकलूज येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या "शिवालय" सेंटरमध्ये महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमा साठी अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा सौ.रेश्मा अडगळे,पंचायत समिती माळशिरसच्या नूतन सदस्या सौ. निशा गिरमे,रोटरी क्लब अकलूजचे सचिव अजिंक्य जाधव,लालासाहेब अडगळे व आदी मान्यवरां बरोबर संपुर्ण ईश्वरीय परिवार उपस्थित होते.

              या कार्यक्रमाची सुरुवात शिवध्वजारोहण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.ब्रह्माकुमारी शिवरात्रि बहनजी यांनी महाशिवरात्रीचे महत्व सांगुन सर्वांना मेडिटेशनद्वारे आपण धावपळीत शांतीचे अनुभव करुन दिले.सोबत ब्रह्माकुमारी गोदावरी बहनजी,ब्रह्माकुमारी अनिता बहनजी व लहान मुलांनी शिव परमात्म स्मृतीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. शिवध्वजारोहन,स्नेहमिलन आणि सांस्कृतिक असा ञिरंगी कार्यक्रम अध्यात्मिक वातावरणात सादर केले.

             याप्रसंगी कु.उत्तरा रणवरे हिने एनसीसी करत असताना ऑल इंडिया बेस्ट कॅन्डीडेट असून नॅशनल कांस्य पदक प्राप्त केले आहे. नुकतेच नवी दिल्ली येथे २६ जानेवारी २०२६ रोजी परेडचे नेतृत्व केले होते.त्याबद्दल कु.उत्तरा व तिच्या आई-वडीलांचा सन्मान करण्यात आला.ब्रह्माकुमारी परिवार हा खुप शिकवण देणारा आहे.मुलांवर संस्कार करताना मेडीटेशन,ज्ञान,सातत्य,जिद्द, सकारात्मक ऊर्जा,मुलांच्या आवडी, धैर्य महत्वाचे आहेत.आपण आध्यात्मिक संपुर्ण ईश्वरीय परिवार ब्रह्माकुमारी शिवरात्री बहेनजी यांनी  ब्रह्माकुमारीज परिवारातील असंख्य  लोक या ध्यानधारणेमुळे खुपच आनंदमय जीवन जगत आहेत तसेच स्वतःच्या मनाला शक्तीशाली बनविण्यासाठी आपले विचार संकल्प,शब्द वातावरण तयार होतात.त्यामुळे सर्वाना मेडिटेशन द्वारे आपण धावपळीत शांतीचे अनुभव करुन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा