Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

*करमाळा शहर हद्दवाढीची भाजप नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांची मागणी; व्होटकर पुल–श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश करावा, तसेच डॉ. व्होटकर पुल ते श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करून मध्यभागी डिवायडर व स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी  भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांनी  नगराध्यक्षा मुख्याधिकारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, करमाळा शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग होऊन सुमारे एक ते दीड किलोमीटर परिसरात नागरी वस्ती निर्माण झाली आहे. अनेक घरे व बंगले उभारले गेले असले तरी हा भाग शहर हद्दीबाहेर असल्याने नागरिकांना गटारी, पाणीपुरवठा, रस्ते, वीज आदी मूलभूत नागरी सुविधा नियमितपणे उपलब्ध होत नाहीत. परिणामी रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर ग्रामीण भागाचा शहर हद्दीत समावेश केल्यास नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा पुरविणे शक्य होईल. तसेच नगरपरिषदेच्या कररचनेतून महसुलात वाढ होऊन शहराच्या विकासालाही चालना मिळेल, असे फंड यांनी निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात नगरपरिषदेकडून ठराव मंजूर करून शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, करमाळ्याचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिर ते शहर हद्दीतील डॉ. व्होटकर पुल या दरम्यानचा रस्ता सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. हा रस्ता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करून मध्यभागी डिवायडर उभारावा तसेच स्ट्रीट लाईटचे पोल बसवावेत, अशीही मागणी सौ. स्वाती महादेव फंड यांनी केली आहे. मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ लक्षात घेता सुरक्षित व सुसज्ज रस्ता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

वरील दोन्ही विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड सामाजिक कार्यकर्ते महादेव आण्णा फंड यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा