Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

जगात ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे प.पु.अशोक जी कोराळे महाराज.*

 *अकलूज --प्रतिनिधी* 

   *केदार लोहकरे*

      *टाइम्स 45 न्यूज मराठी*


"जगात अनेक प्रकारची दान दिली जातात परंतु विद्या किंवा ज्ञान हे असे धन आहे जे वाटल्याने वाढते आणि चोरीला ही जात नाही. म्हणूनच ज्ञानदान हे जगातील सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ दान आहे," असे प्रतिपादन प.पु.अशोक जी कोराळे महाराज यांनी केले.ते सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या भव्य निरंकारी सत्संग सोहळ्यात बोलत होते .श




            ​यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,ज्ञानामुळे माणसाचे जीवन प्रकाशमय होते आणि समाज परिवर्तनासाठी ब्रम्हज्ञानाशिवाय पर्याय नाही, निरंकारी मिशन हेच पवित्र काम करीत असून सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांचे स्वप्न या पुण्यतिथीच्या निमित्ताने डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे जनसेवा संघटनेच्या माध्यमातून हा सत्संग सोहळा आयोजित करुन समाजाला एक चांगले विचार व ब्रम्हज्ञान प्राप्त करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देत आहेत या बद्दल त्यांचे आभार  मानले.

                 प्रारंभी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व लोकनेते कै.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे प्रतिमेचे पुजन प.पु.अशोक जी करोळे महाराज व जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांचे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास जनसेवा संघटना मार्गदर्शक माणिकराव मिसाळ, सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख विराज खराडे,जनसेवा युवक नेते अण्णासाहेब शिंदे,निरंकारी मंडळ अकलुज युनिटचे मुखी दिलीपजी कांबळे महाराज,जनसेवा सचिव विलासराव लोंढे,भारत तात्या मगर, जनसेवा सरचिटणीस सुधीर रास्ते,जनसेवा नेते जेष्ठ नेते हरिआप्पा माने,विवेक गवळी,पिंटु वैद्य-देशमुखे,ज्ञानप्रचारक बाळासाहेब नामदास महाराज, नवनाथ भाऊ साठे,बबनराव शेंडगे, विकास शिंदे,हुसेन शेख,संजय गाडे,सागर देशमुख,दिलीप सकट,संग्राम भोसले,दिपक सुत्रावे,चंद्रकांत इंगवले पुणेकर, राहुल जाधव,चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब शिंदे,बंडु वस्ताद जाधव,फिरोज शेख,रघुनाथ साठे,आप्पा जाधव,अफसर मोहोळकर,गब्बर बागवान,सचिन पाटील,रोहिदास हनवते,यांचेसह निरंकारी मिशनचे पदाधिकारी, जनसेवा संघटनेचे  पदाधिकारी व अकलुज पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा