*कळंब-धाराशिव, प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
कळंब तालुक्यातील शिराढोण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पाटील गल्ली परिसरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच परिसर भगव्या पताका, आकर्षक फलक आणि रोषणाईने सजविण्यात आला होता. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पराक्रमाची, स्वराज्य स्थापनेच्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची आठवण करून दिली. शिवरायांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
युवक मंडळाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पोशाखातील युवक-युवतींच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. लहान मुलांनी साकारलेले शिवरायांचे व मावळ्यांचे वेश परिधान केलेले रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम, देशभक्तीपर गीते आणि प्रेरणादायी भाषणे यांचे आयोजन करण्यात आले. तसेच उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पाटील गल्लीतील नागरिक, युवक मंडळ आणि महिला मंडळ यांच्या सहकार्यामुळे शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिराढोणकरांनी एकजुटीचा संदेश देत शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
शिवजन्मोत्सवाच्या या जल्लोषमय सोहळ्याने शिराढोण गाव देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. यावेळी प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद माजी सदस्य शहाजीराव पाटील शिराढोण पोलीस निरीक्षक धरणीदर कोळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य राजेश्वर बाप्पा पाटील पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर पवार प्रताप तात्या पाटील लक्ष्मण पाटील शिवाजी आबा पाटील संजय आबा पाटील विष्णुदास काळे अवधूत पाटील बाहुबली संगवे नासिरभाई पठाण अल्ताफ भाई शेख दादा काळे शैलेश पाटील अमोल खड्डे रंजीत काका पाटील सोनू यादव रमण पाटील राहुल ठोंबरे बापूसाहेब यादव पंकज पाटील कुमार पाटील अमरदीप यादव सुरज पाटील सचिन परदेशी अविनाश महाजन दत्ता महाजन यांच्यासह महिला शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा