Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

करमाळा पोलीसांची दमदार कामगिरी ३ तोळे वजनाची सोन्याची चैन कि.अं.४,५०,०००/- रू.ची, पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणारे टोळीस अटक

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


३ तोळे वजनाची सोन्याची चैन कि.अं.४,५०,०००/- रू.ची, पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणारे टोळीस करमाळा पोलिसांनी अटक केली असून पोलिसांकडून मिळालेली  सविस्तर माहिती असे कि

दि. २०/०६/२०२५ रोजी दुपारी ३/३० वा. चे सुमारास फिर्यादी नामे रविंद्र शंकर देशमुख वय ६५ वर्षे व्यवसाय शेती रा. वांगी नं. १ ता. करमाळा जि सोलापूर हे मोटारसायकलवरून करमाळा ते वांगी नं १ कडे जात असताना खडकेवाडी फाट्याजवळील बिले पेटोल पंपाजवळ आले असता चार अनोळखी इसमांनी त्यांची मोटारसायकल थांबवून त्यांना ते पोलीस असल्याचे बतावणी करून त्यांना पुढे मर्डर झाला आहे आपले जवळील सोने पिशवीत काढून ठेवा असे सांगून फिर्यादीने त्याचेजवळील सोन्याचे दागिने पिशवीत ठेवून वरील चार अनोळखी इसमांनी सोन्याची पिशवी फिर्यादीस फसवुन घेवून मोटारसायक' वरून निघून गेले म्हणून त्याबाबत करमाळा पोलीस ठाणेस गु.र.नं. ४९७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१८(४),२०४ ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून, प्राप्त फुटेजचे अवलोकन करून, अधिक तपास करून आरोपी हे

१. जहीर अब्बास अली शाकुब अली रा शिवाजीनगर परळी वै.जि बीड

२. अली मिर्झा दर्वेश रा शिवाजीनगर परळी वै.जि बीड

३. लाला समीर जाफर शेख रा. आंबीवली कल्याण जि ठाणे

४. जाफर आझम सयद रा. आंबीवली कल्याण जि ठाणे हे नमुद गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले.


त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोसई सुशीलकुमार पाखरे यांनी नमुद गुन्हयात आरोपीतांना अटक करून आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता नमुद आरोपीतांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे तसेच आरोपीनामे १. जहीर अब्बास अली शाकुब अली वय ४२ वर्षे रा शिवाजीनगर परळी वै.जि बीड यांने फिर्यादीस फसवुन नेलेले मुददेमालापैकी एक सोन्याची चैन अंदाजे ३ तोळे वजनाची कि अं ४,५०,०००/- रू.ची त्याचेकडून हस्तगत केलेली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही.एस. (भा.पो.से.) करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोसई सुशीलकुमार पाखरे, संदेश चंदनशिव, पोहेकॉ/१६४८ अजित उबाळे, पोना/११६२ मनिष पवार, पोना/९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/९६१ गणेश खोटे, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/ २५ हनुमंत भराटे, पोकॉ/१५२४ अमोल रंदिल यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे हे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा