Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

करमाळा शहरातील कुमारी महेरीन सय्यद यांनी केला रमजान महिन्यातील एक दिवसाचा रोजा पूर्ण Head

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*

सध्या रमजानचा कडक असा महिना चालू आहे या रमजानच्या महिन्यामध्ये रोजाला विशेष महत्त्व असते इस्लाम धर्मामध्ये मूळ पाच तत्वा पैकी रोजा याला विशेष महत्त्व आहे या महिन्यांमध्ये करमाळा शहरातील पोथर नाका येथील कुमारी महेरीन अब्दुलसमद सय्यद या सहा वर्षाच्या चिमुकलीने रमजान महिन्यातील पहिला कडक असा रोजा पूर्ण केला महेरीन सय्यद ही करमाळा शहरातील लीड इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे

कुमारी महेरीन अब्दुल सम्मद सय्यद या सहा वर्षाच्या चिमुकलीने सदरचा रोजा वेताळ पेठ येथील जामिया मशिद मध्ये सोडला यावेळी मशिदीचे मौलाना अन्वर शेख सहित माजी नगरसेवक फारूक जमादार, हाजी उस्मान सय्यद, मुन्ना काजी, बबलू पठाण, इस्माईल सय्यद आदि बहुसंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होती


अगदी लहान वयात रमजान महिन्यातील एक दिवसाचा उपवास महेरीन या चिमुकलीने  पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा