Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

सुरवड ता.इंदापूर येथील प्रगतिशील बागायतदार ज्ञानदेव श्रीरंग मगर यांचे निधन.

 सहसंपादक -डॉ. संदेश शहा 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9922419159



सुरवड ( तालुका इंदापूर ) येथील श्री भैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेव श्रीरंग मगर ( वय ७४ ) यांचे अल्पशा आजाराने सकाळी नऊ वाजता निधन झाले. त्यांना मामा या नावाने ओळखले जात होते. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर सर यांचे ते धाकटे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड असा परिवार आहे.

 श्री भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते संस्थेचे संस्थापक चेअरमन होते. संस्था उभारणी वेळी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी कै. कृष्णराव मगर व  शंकरराव मगर यांच्या बरोबरीने त्यांनी संस्था उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९५२ साली झाला. त्यांचे शिक्षण एमएससी ऍग्री झाले असून ते प्रगतशील बागायतदार होते. यांच्या प्रयत्नामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी मदत झाली. शेटफळ पाटी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, दूधगंगा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, हभप श्री कुरुळे सर, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे सर्व सभासद शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांना इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे माजी संचालक शिवाजीराव कोरटकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा