Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

अजितदादा हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, दादा कर्तबगार, आदरयुक्त दरारा असणारे, अष्टपैलू नेता, महाराष्ट्रातील डॉक्टरांनी वाहिली साश्रुनयनांनी अजित दादांना श्रद्धांजली.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक मो. 9922419159



राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कर्तबगार नेते होते, ते आपल्या कामाच्या शैलीमुळे जनमानसात लोकप्रिय होते. आपल्या जनसेवेच्या कार्यामुळे ते अमर झाले आहेत. मात्र त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण पवार कुटुंबियांना ट्रोल करणे चुकीचे आहे असे मत  डॉ. रजनी इंदुलकर यांनी व्यक्त केले



शुक्रवार दि.२७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांना महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या वतीने पुणे येथे नि. तू. मांडके सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी होमिओपॅथिक डॉक्टरांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सर्वच वक्त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, दादा तुम्ही आमचे प्रश्न सोडविल्यानंतर आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू शकलो नाही अशी खंत यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी सर्व डॉक्टरांनी पवार परिवाराबरोबर सतत असल्याची ग्वाही दिली. यावेळी अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूचे सत्य बाहेर यावे तसेच त्यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात यावे तसेच बारामती विमानतळ, आयुर्वेद कॉलेज यांना स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्यावे अशी मागणी उपस्थितांनी केली.

ही श्रद्धांजली सभा राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांचे मार्गदर्शक डॉ. सौ. रजनी इंदुलकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. 

डॉ. रजनी इंदुलकर मॅडम पुढे म्हणाल्या, आमच्या दुःखात तुम्ही सर्वजण सहभागी झाला, अनेक नेते बारामती मध्ये आले, हजारो, लाखो लोक बारामतीत आले. तुम्ही सर्वांनी आमचे दुःख वाटून घेतले. मी तमाम बारामतीकरांबरोबरच तुम्हा सर्वांबद्दल  कृतज्ञता व्यक्त करते. तुमच्या सुख दुःखात पवार कुटुंब तुमच्या सोबत कायम राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या दुखद प्रसंगात काहींनी आम्हाला ट्रोल केले, याचे आम्हाला दुःख झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


 यावेळी डॉ. सुधीर कोठारी, डॅा. सुनील जगताप, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ.अजय तायडे, डॉ. रणजित निकम, डॉ.सुनीता मोरे, डॉ. संदेश शहा, डॉ. दीपक जगताप, डॅा. धनंजय जोशी, डॅा. शाम आहेरराव, डॉ. शशिकांत कदम, डॅा. लालासाहेब गायकवाड, डॅा. शिवदीप ऊंद्रे, डॅा. अनुपमा गायकवाड, डॅा. राजेंद्र जगताप, डॅा. स्वाती जगताप, डॅा. मंजिरी जगताप, डॅा. पोखरणा, डॉ. मनीषा दणाने, डॉ. संदीप लुणावत, डॉ. संगिता माने, डॉ. ज्योती रसाळ, डॉ. रवी पाटील, डॅा. राहुल सूर्यवंशी, डॉ. एच. के. देशमुख, डॉ. दिपक पाटील, डॅा. गणेश निंबाळकर, डॉ. सुनील होनराव आदींनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी

डॅाक्टरांनी अजित दादांच्या अनेक आठवणी व दादांनी केलेली कामे याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉ. अनुपमा गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. रेखा माने यांनी म्हटलेल्या पसायदानाने  श्रद्धांजली सभेची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा