Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

करमाळा शहरातील कुरेशी मोहल्ला येथील बहीण भावंडांनी केला रमजान महिन्यातील एक दिवसाचा उपवास पूर्ण Head

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*

सध्या रमजानचा कडक असा महिना चालू आहे या रमजानच्या महिन्यामध्ये रोजाला विशेष महत्त्व असते इस्लाम धर्मामध्ये मूळ पाच तत्वा पैकी रोजा याला विशेष महत्त्व आहे या महिन्यांमध्ये करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौकामधील कुरेशी मोहल्ला येथील बहिण भावंडांने रमजान महिन्यातील पहिला कडक असा रोजा पूर्ण केला आलीना इम्तियाज कुरेशी तसेच मोहम्मद हरीश इम्तियाज कुरेशी असे दोघा बहिण भावंडाचे नाव आहे  

कुमारी आलीना इम्तियाज कुरेशी वय 7 तर मोहम्मद हरीश इम्तियाज कुरेशी वय 8 या दोघा बहीण भावंडाणे करमाळा शहरातील एसटी स्टँड समोरील नूराणी मशीद मध्ये आपला रोजा सोडला त्या दोघा बहीण भावंडाणे सकाळी साडेपाच वाजल्यापासून तर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत अन्नपाणी न घेता रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक असा उपवास पूर्ण केला यावेळी मशिदीचे धर्मगुरू मौलाना मरगबुल हसन सहित इतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मशिदीमध्ये हजर होते 

 अगदी लहान वयात दोघा चिमुकल्याने रमजान महिन्यातील उपवास पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे

करमाळा येथील सुप्रसिद्ध वाद्य न्यू दोस्ती बँजो पार्टी करमाळावाला यांचे चालक इम्तियाज अब्दुल आझाद कुरेशी यांचे ते दोन्ही मुले आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा