Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

सुरु असलेल्या ११ केव्ही सब स्टेशनमध्ये मजुराला विजेचा जबरदस्त धक्का खबरदारी आणि सुरक्षिततेच्या अभावामुळे मजूर जबर जखमी

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*

करमाळा, - धोकादायक असलेल्या आणि प्रवेश निशिद्ध असलेल्या ११ केव्ही सब स्टेशनच्या आत सुरू असलेल्या रंगकामा दरम्यान परप्रांतीय मजुराला जोरदार विजेचा धक्का बसला आहे. या घटनेत त्याच्या अंगावरील कपड्यांना आगही लागल्याने हा मजूर उंचीवरून खाली कोसळला. दैव बलवत्तर म्हणून या मजुराचा जीव वाचला असला तरी त्याला उंचीवरून पडल्यामुळे तसेच भाजल्यामुळे शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. 

गुरुवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान करमाळा शहरांमध्ये असलेल्या श्रीदेवीचा माळ येथे असलेल्या सबस्टेशन मध्ये देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंडा येथील ठेकेदार विठ्ठल सुपे यांनी हे काम घेतलेले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी कर्नाटकातील इंडी येथील मशाक शेख (वय-३०) हा मजुर सकाळी सब स्टेशनमधील खांबाच्या सांगाड्यांना रंग देत होता. उंच ठिकाणी हे काम सुरू असताना साडेआठच्या दरम्यान शेख याला जोरदार विजेचा धक्का तर बसलाच परंतु त्याच्या अंगावरील पॅन्टही पेटली. अचानक झालेल्या प्रकारामुळे भांबावलेला शेख हा खाली पडला. यावेळी इतर मशाकच्या सहकाऱ्यांनी त्याच्या कपड्याना लागलेली आग विझवून त्याला करमाळा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात मशाक याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून   त्याचे पाय गंभीर स्वरूपात भाजले आहेत.

या अपघाताबाबत मशाक याच्या सहकाऱ्यांकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, वीज प्रवाह बंद आहे म्हणून सांगण्यात आल्यानंतरच मशाक हा काम करण्यासाठी सबस्टेशन मध्ये गेला होता. या घटनेची माहिती घेण्याकरिता  करमाळा उप अभियंता कलावते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वीज प्रवाह सुरू कसा राहिला याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

सब स्टेशन सारख्या धोकादायक ठिकाणी काम करत असताना ठेकेदाराने मजुराला योग्य ती सुरक्षिततेची साधने पुरवणे गरजेचे आहे मात्र या घटनेतील जखमी मशाक याच्याजवळ अशी कुठलीही साधने नव्हती. वीजप्रवाह बंद असल्याचे सांगितले गेल्याने तो बिनधास्त आपले काम करत होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून पोटासाठी मिळेल ते काम करणारा मशाक मृत्यूच्या दाढेतून वाचला आहे.

सुरु असलेल्या ११ केव्ही सब स्टेशनमध्ये मजुराला विजेचा जबरदस्त धक्का 

खबरदारी आणि सुरक्षिततेच्या अभावामुळे मजूर जबर जखमी 

करमाळा, प्रतिनिधी - धोकादायक असलेल्या आणि प्रवेश निशिद्ध असलेल्या ११ केव्ही सब स्टेशनच्या आत सुरू असलेल्या रंगकामा दरम्यान परप्रांतीय मजुराला जोरदार विजेचा धक्का बसला आहे. या घटनेत त्याच्या अंगावरील कपड्यांना आगही लागल्याने हा मजूर उंचीवरून खाली कोसळला. दैव बलवत्तर म्हणून या मजुराचा जीव वाचला असला तरी त्याला उंचीवरून पडल्यामुळे तसेच भाजल्यामुळे शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. 

गुरुवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान करमाळा शहरांमध्ये असलेल्या श्रीदेवीचा माळ येथे असलेल्या सबस्टेशन मध्ये देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंडा येथील ठेकेदार विठ्ठल सुपे यांनी हे काम घेतलेले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी कर्नाटकातील इंडी येथील मशाक शेख (वय-३०) हा मजुर सकाळी सब स्टेशनमधील खांबाच्या सांगाड्यांना रंग देत होता. उंच ठिकाणी हे काम सुरू असताना साडेआठच्या दरम्यान शेख याला जोरदार विजेचा धक्का तर बसलाच परंतु त्याच्या अंगावरील पॅन्टही पेटली. अचानक झालेल्या प्रकारामुळे भांबावलेला शेख हा खाली पडला. यावेळी इतर मशाकच्या सहकाऱ्यांनी त्याच्या कपड्याना लागलेली आग विझवून त्याला करमाळा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात मशाक याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून   त्याचे पाय गंभीर स्वरूपात भाजले आहेत.

या अपघाताबाबत मशाक याच्या सहकाऱ्यांकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, वीज प्रवाह बंद आहे म्हणून सांगण्यात आल्यानंतरच मशाक हा काम करण्यासाठी सबस्टेशन मध्ये गेला होता. या घटनेची माहिती घेण्याकरिता  करमाळा उप अभियंता कलावते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वीज प्रवाह सुरू कसा राहिला याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

सब स्टेशन सारख्या धोकादायक ठिकाणी काम करत असताना ठेकेदाराने मजुराला योग्य ती सुरक्षिततेची साधने पुरवणे गरजेचे आहे मात्र या घटनेतील जखमी मशाक याच्याजवळ अशी कुठलीही साधने नव्हती. वीजप्रवाह बंद असल्याचे सांगितले गेल्याने तो बिनधास्त आपले काम करत होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून पोटासाठी मिळेल ते काम करणारा मशाक मृत्यूच्या दाढेतून वाचला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा