Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

रावगाव परिसरातील वीजेच्या प्रश्नावर आमदार नारायण आबा पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत उठवला आवाज

 

*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*




 
काल सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत करमाळा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील वीजेच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली व सदर‌ बैठकीत रावगाव येथील ३३/११ केव्हीए क्षमतेचे सबस्टेशन व‌ सध्या या परिसरात शेतीसाठी दिला जाणारा खंडीत आणि अपुरा वीज पुरवठा यावर आवाज उठवला. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील सांगितले की रावगाव आणि परिसरातील शेतीपंपाचा वीज प्रश्न कायमचा सुटला जावा म्हणुन आपण सन २०१६ मध्ये आमदार असताना ३३/११ केव्हीए क्षमतेचे एक नवीन वीज केंद्र मंजूर करुन‌ घेतले. या नियोजित मंजुर सबस्टेशनची उभारणी लवकर सुरू व्हावी यासाठी वेळोवेळी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. परंतू त्यावेळी काही विरोधकांनी जागेचा प्रश्न‌ निर्माण केला. याचीही सोडवणुक करत आपण यासाठी नवीन जागा उपलब्ध करुन दिली. जागेचे करारपत्र करत असताना संबंधित व्यक्ती हयात राहीली नाही. अशा अनेक अडचणी येत असताना सत्तांतर झाले व मागील पाच वर्षे हा प्रश्न तसाच रेंगाळत राहिला. परत एकदा आपण २०२४ मध्ये आमदार पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महावितरणची आढावा बैठक घेतली व रावगाव येथील सबस्टेशनची उभारणी लवकरात लवकर पुर्ण करा अशा सुचनाही दिल्या. यानंतर काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपण हा प्रश्न मांडला असुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरले. रावगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे सबस्टेशन लवकर उभारण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या रावगाव व करमाळा तालुक्यातील इतर काही ठिकाणी शेती पंपासाठी रात्रपाळीत लाईट दिली जात आहे. वास्तविक पाहता संपुर्ण राज्यात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा केला जात असताना व सरकारच्या महावितरणला तशा सुचना असताना रावगाव परिसरात रात्री वीजपुरवठा केला जात आहे. तसेच करमाळा तालुक्यातील अनेक ठीकाणी क्षमतावाढ करुनही शेतीसाठी कमी दाबाने वीज पुरवठा केला जातोय. यामुळे वीजेची कमतरता भासुन सतत वीज खंडीत होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे याचा परिणाम रब्बीच्या पिकांवर‌ होत असल्याने महावितरण कडून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने व अखंडीत वीज पुरवठा दिला जावा अशी मागणी कालच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा