*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शंकरनगर-अकलूज येथील महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या महाशिवरात्र यात्रेचे उदघाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महाशिवरात्र यात्रा महोत्सव समितीच्या चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्या वतीने ११ ते १६ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान महाशिवरात्री यात्रा,कृषी व औद्योगिक प्रदर्शन,पिक प्रदर्शन व स्पर्धा,दुग्ध स्पर्धा,जनावरांचा बाजार तसेच जंगी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आले
या यात्रेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व मदनसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी व्हा.चेअरमन शंकराव माने देशमुख,संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते-पाटील,कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले,हर्षाली निंबाळकर, सुजाता शिंदे,संचालक प्रकाशराव पाटील,नानासाहेब मुंडपणे,रामचंद्र सिद,लक्ष्मण शिंदे,माजी संचालक मोहनराव लोंढे,विजयराव हेगडे, सरपंच वर्षा सरतापे यांच्यासह अधिकारी कामगार उपस्थित होते. याप्रसंगी पीक प्रदर्शन व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर अकलूज येथील रुपाली मशिनरी दुकान आगीतून गांधी कुटुंबाची सुखरुप सुटका करणाऱ्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी ज्ञानदेव पोळ,सत्यजित चव्हाण,बाळासाहेब मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
शनिवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा.पीक स्पर्धेमध्ये आलेल्या शेती मालाचे उत्कृष्ट नमुन्यांचे परिक्षकांकडून निरिक्षण व बक्षीसपात्र नमुन्यांची निवड तसेच दुपारी ४ वा.जातीवंत जनावरांची निवड होणार आहे. रविवार,दि. १५ रोजी पहाटे ५.३० वा. महाशिवरात्र यात्रेनिमित्त श्रीशिवपार्वतीस अभिषेक व महापूजा विश्वतेजसिंह मोहिते- पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी शिवांशिका मोहिते-पाटील उभयतांचे हस्ते आयोजित केली आहे.सदर दिवशी सकाळी ६.३० ते ७ या वेळेत दुग्ध स्पर्धेचे आयोजन केले असून यात्रेमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धेतील विजेत्याना बक्षीस वाटप सायंकाळी ५ वा.यात्रा ऑफिस समोर होणार आहे.सोमवार दि.१६ रोजी दुपारी ३ वा.जंगी कुस्त्याच्या फडाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, कार्याध्यक्ष मदनसिंह मोहिते- पाटील,नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा