Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

अकलूज येथे शिवजयंतीनिमीत्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.*

 *अकलुज --प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


रक्तदान हेच जीवनदान हा उदात्त हेतूने ठेवून अकलूज येथील मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात ७५ हून अधिक तरुणांनी व नागरिकांनी रक्तदान केले.

            ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते या रक्तपेढीच्या टीमने सुरक्षीतपणे रक्तसंकलन केले. ज्यामुळे रुग्णालयांमधील रक्त तुटवडा दूर करण्यास मदत होणार आहे.अकलूज येथील विजय चौकात येथे सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत या विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये हिंदू- मुस्लिम बांधव आणि महिलांची विशेष उपस्थिती होती.या रक्तदान शिबीराचे उद्घाटन अकलूज नगरपरीषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक,सयाजीराजे मोहिते पाटील,क्रांतीसिंह माने पाटील, ईशीता मोहिते-पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, व्यापारी संघाचे अध्यक्ष ॲड.नितीन खराडे-पाटील,उपाध्यक्ष विशाल गोरे,ज्येष्ठ संचालक डॉ.राजीव राणे, नवनाथ सावंत,कृषी पर्यवेक्षक उदय साळुंखे उपस्थित होते. 




            मराठा व्यापारी संघाच्या वतीने रक्तदान शिबिरासोबतच वर्षभरामध्ये निराधार पालकत्व हरवलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.त्याच बरोबर दिवाळीमध्ये निराधार महिलांना साडी दिवाळीचे सुगंधी उटणे,साबण,पणती आणि फराळाचे देऊन सार्थक दिपावाली साजरी केली जाते.संघाच्या या कार्याचे उपस्थित सर्व प्रमुख अतिथींनी विशेष कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश महाडिक,सी ए विक्रांत माने देशमुख,योगेश देशमुख,विठ्ठल गायकवाड,जगदीश कदम,कुंडलिक गायकवाड,राम चव्हाण यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव प्रा.धनंजय देशमुख यांनी तर आभार इंद्रजीत नलवडे मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा