Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

साडे तालुका करमाळा येथील शेतकरी श्री बापूराव रोकडे यांचा सपत्नीक कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेटफळ ना. येथे झाला यथोचित सन्मान

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा तालुक्यातील साडे येथील प्रगतशील बागायतदार श्री बापूराव औदुंबर रोकडे यांनी अल्पावधीतच कृषी क्षेत्रात भरीव उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा व त्यांचे पत्नीचा करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाचे या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला सदरचा सन्मान शेटफळ नागोबाचे येथील नागराज मशिनरी शेती मॉल फर्मचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोकविकास फार्मर्स प्रोड्युसर कंपनी च्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या भव्य शेतकरी मेळाव्यामध्ये साडे येथील प्रगतशील बागायतदार श्री बापूराव रोकडे यांनी त्यांच्या शेतीमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा व त्यांचे पत्नी सौ उज्वला बापूराव रोकडे या दोघा पती-पत्नीचा शेटफळ येथे शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात याच वेळी करमाळा तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांचा देखील सन्मान करण्यात आला सदरचा सन्मान करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी सौ अंजना कृष्णा मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला



 नव्याने सुरू केलेल्या नागराज मशिनरी शेती मॉल या फर्मचा वर्धापन दिन कार्यक्रम व त्यानिमित्त  *लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनी,शेटफळ(ना)च्या* वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा व करमाळा तालुक्यातील कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या *शेतकऱ्यांचा सन्मान कार्यक्रम* मंगळवार दि. २४/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत शेटफळ(ना)ता.करमाळा येथे संपन्न झाला.



यावेळी तालुक्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे 

*साडे येथील प्रगतशील बागायतदार श्री बापूराव औदुंबर रोकडे व उज्ज्वला बापूराव रोकडे यांना लोकविकास कृषी गौरव पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले. यावेळी

प्रमुख उपस्थिती म्हणून

*मा. अंजना कृष्णा (IPS) (उपविभागीय पोलीस अधिकारी)*

*मा.डाॅ.गणेश करे पाटील,*

*मा.किरण पाटील (कृषीतज्ञ, जैन इरिगेशन, सोलापूर)*

*मा.किरण डोके (के. डी. एक्सपोर्ट, कंदर)*

*मा.संजय वाकडे साहेब (उपविभागीय कृषी अधिकारी)*

मा.सोमनाथ हुलगे (शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी)

मा.महेंद्र पाटील,मा.राजेंद्र बारकुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरच्या कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा