*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट अकलूज शाखेच्या कर्ज मेळाव्यास चांगला मिळाला आहे.अशी माहिती शाखेचे पालक अधिकारी बारकू बच्छाव यांनी दिली. रेणुकामाता मल्टीस्टेट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रशांत चंद्रकांत भालेराव यांनी महाराष्ट्रात वर्षभर कर्ज सुविधा सर्व शाखेतून सुरु केली आहे. ३०,००० रुपयापासून ते १,००,००० रुपयांपर्यंत अशी वैयक्तिक कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.याशिवाय कॅश क्रेडिट लोन, वैयक्तिक कर्ज,होम लोन,मॉर्गेज लोन व वाहन तारण कर्ज आदी विविध प्रकारचे कर्ज सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध करण्यात आली आहे.
कर्ज सुविधा वर्षभर उपलब्ध केल्यामुळे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. आजच्या लोन मेळावा दिनास खातेदार सौ.स्वाती सुनील कवी व ज्ञानेश्वर मिसाळ यांची लोन फाईल जागेवर मंजूर करून चेक देण्यात आले आहे.संदीप गिरमे,महादेव एकतपुरे,मोहन मिसाळ,महादेव ऐवळे,सागर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच लोन मेळाव्यास वरिष्ठ व्यवस्थापक बारकू बच्छाव उपस्थित होते.
हा लोन मेळावा यशस्वी होण्यास शाखा अधिकारी सौ. आरती मॅडम,क्लर्क रणजीत शिंदे, तेजस खडके,समाधान साठे यांनी विशेष प्रयत्न केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा