Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

सराटी येथे नीरा नदीच्या पाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तरंगता अनोखा देखावा, शिवप्रेमींची पाहण्यासाठी अलोट गर्दी.

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


----- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सराटी येथे नीरा नदीत छत्रपतींचा तरंगता देखावा पाहण्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. नदीवरील पुलावरून तसेच बोटीतून प्रत्यक्ष देखावा पाहण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

    सुरज कुंभार व रोहित पाटसकर या दोन शिवप्रेमींनी स्वखर्चातून साडेतीन लाख रुपये खर्च करून नीरा नदीत छत्रपतींचा तरंगता अनोखा देखावा सादर केला आहे. सदरचा देखावा तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे सुरज कुंभार यांनी सांगितले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पाहून शिवप्रेमी जागृत व्हावा याच उद्देशाने देखावा तयार केल्याचे रोहित पाटसकर यांनी सांगितले.


    सदरचा तरंगता देखावा करण्यासाठी जवळपास पस्तीस बॅरलचा वापर करण्यात आला आहे. त्यावर हत्तीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, सोबतीस हातात भाला घेऊन उभे राहिलेले दोन मावळे असा देखावा तयार करण्यास जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागला. याला जवळपास तीन लाखांचा खर्च आला आहे.

     नीरा नदीच्या पाण्यावर तरंगता देखावा पाहण्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. त्यांना देखावा जवळून पाहण्यासाठी मोफत बोटीची सोय करण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफची नऊ जणांची टिम कार्यरत ठेवण्यात आली होती. त्याच्या जोडीला तरंगता भगव्या झेंड्याचा दिखावाही सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. जय भवानी जय शिवाजी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

फोटो - सराटी येथे नीरा नदीच्या पाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तरंगता अनोखा देखावा सादर केला आहे.

-------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा