इंदापूर,डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूल मध्ये जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात मोठ्या भक्तिभावाने तसेच देशभक्तीच्या वातावरणात शिवजयंती जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
यानिमित्त संपूर्ण शाळा भगव्या पताकांनी व आकर्षक सजावटीने उजळून निघाली होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
यावेळी शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त अंगद शहा म्हणाले, विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्याग व पराक्रम यांची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाराजां प्रमाणे धैर्यवान, प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि देशप्रेमी नागरिक बनावे, हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे. अशा प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासाबद्दल आदर निर्माण होतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला देखील चालना मिळते.
विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्याग व पराक्रम यांची ओळख करून देण्यासाठी तसेच राष्ट्रपेम जगविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म, बालपण, शौर्यगाथा आणि पराक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांच्या धैर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि स्वाभिमान या गुणांचे महत्त्व पटवून देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांच्या जहागिरीचा इंदापूर हा परगणा होता. इंदापूर येथील लढाईत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांना वीरमरण आले होते याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी सुंदर पाळणा सादर करून कार्यक्रमात भक्तिभावाची रंगत आणली. इयत्ता पहिलीतील क्षितिज सांगवे या विद्यार्थ्याने जोशपूर्ण शिवगर्जना दिल्याने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. प्ले ग्रुपमधील चिमुकल्यांनी "शिवाजी महाराज की जय" अशा घोषणा देत कार्यक्रमात निरागसतेची गोडी भरली.
नर्सरी व के वनच्या विद्यार्थ्यांनी महाराजांवर प्रभावी भाषणे सादर करत त्यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.
यानंतर प्राथमिक विभागातील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण पोवाडा सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. शेवटी एकत्रित शिवगर्जनेने कार्यक्रमाची दिमाखदार सांगता झाली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माधुरी देवकर मॅडम यांनी केले.
यावेळी शहा ग्लोबल स्कूलचे प्रमुख विश्वस्त मुकुंद शहा, भरत शहा, सौ. अंकिता मुकुंद शहा, सौ. वैशाली भरत शहा, अंगद शहा व सौ. रुचिरा शहा, शालेय शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा