*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
जेऊर संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीस व सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी IAS अधिकारी बालाजी पार्वती दिगंबर मंजुळे (भा.प्र.से) हे आंध्र प्रदेश राज्यात ग्राम विकास आणि पंचायत राज विभागातील सचिव यांच्या हस्ते व आजी-माजी सैनिक यांच्या हस्ते स्मृतीस व प्रतिमेस सर्व बहुजन महापुरुषांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली व यावेळेस उपस्थित आजी-माजी सैनिक तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर,जेष्ठ नागरिक, जेऊर पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुमारी सिद्धी क्षीरसागर इयत्ता ७वी तील विद्यार्थिनीने बहारदार शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज व इतर सर्व महापुरुषावरती आपल्या बहारदार शैलीमध्ये आपले विचार मांडले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे महापुरुषांच्या विचारांची पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास काही माता-भगिनींनी ही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवप्रेमींनी उत्साहात जयंती साजरी केली. तसेच यावेळी पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या भव्य मिरवणुकीस सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर साखरे(सर) यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा