Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ मार्च, २०२६

रमजान मुबारक 2026* *रोजा :नंबर 016 वा* *शुक्रवार दिनांक, 06-03-2026* *विषय - "अन्यया - अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला जातो तो " जिहाद*

 *डॉ. सलीम शाहिदा सिकंदर शेख*

*श्रीरामपूर*

*मोबाईल 9271640014.*.



"जिहाद" ही ईस्लामला दिलेली फार मोठी देणगीच आहे,मात्र जगात जिहादचा फार विकृत स्वरूपात अपप्रचार केला व दाखविले जातो,

" जिहाद" शब्दाचा वेगवेगळ्या अर्थाने अर्थ घेतला जातो. (१) "सत्याचा  असत्या विरूद्ध  लढा " होय, (२) दुष्टांच्या विरूद्ध सत्याचा लढा होय, (३) दुष्कार्माच्या विरोधी सत्य कर्माचा लढा, (४) दुराचारा विरोधी सदाचाराचा लढा होय, (५) अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी न्यायाचा लढा होय, (६) तसेच जिहादचा अर्थ " कष्ट सहन करणारा" (पवित्र कुराण ,अन - नहल अ.नं.११०),

(७)  सत्यासाठी, न्यायासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे (पवित्र कुराण,अल-फुरकान आ.नं.५१).






    प्रेषीत मुहम्मद स्व.सल्लमनी सांगितले की" संयम बाळगणे  व  आपल्या वाईट - कृत्यांवर  आवर  घालणे म्हणजे सर्वाधिक मोठा   जिहाद आहे ! कारण अल्लाहाला संयम बाळगणारे जास्त पसंत आहेत"पवित्र कुराण (सुरह अल - नहल आ.नं. ११०). 

"परवानगी दिली युद्ध करण्याची,  त्या लोकांना ज्यांच्या- ज्यांच्या लोकांवर अत्याचार केले गेले, कारण ते अत्याचार पीडीत आहेत " (पवित्र कुराण,सुराहा नं. २२ अल- हशर ,आ .न.३९ ).

 "आणि त्यांच्याशीच युद्ध करा,  जिथे कुठे तुमचा त्यांच्याशी जे अत्याचार- अन्याय -आतिरेक करणारांशी सामना होईल   .  आणि त्यांना अतिरेक करणाऱ्यांना त्या ठिकाणापासून   हाकलून , हुसकावून लावा ,  जिथून तुम्हाला त्यांनी (अत्याचार करण्याऱ्यांनी) हाकलले होते. "पवित्र कुराण ,सुराहा नं.२ अल- बकराहा, आ.नं.१९३),

संपूर्ण जगामध्ये शांतता स्थापन करणे हे ईस्लामचे प्रथम प्रमुख उद्दिष्ट राहीलेले आहेत, शांततेच्या मार्गाने शांतता प्रस्थापित करणं हे सत्य आहे. युद्ध करणं हा अगदी शेवटचा पर्याय उरलेला असतो.

ईस्लामने शत्रुशी देखील न्याय करण्याचा हुकूम दिला आहे हिच बाब न्यायाच्या सर्वोच्च आदेशाची ग्वाही देते व आपली प्रस्तुती  करते. 

 यासंदर्भात पवित्र कुराण म्हणतात की ,"हे ईमानवंतांनों  अल्लाहा (परमेश्वर) साठी  सत्यावर सतत अटळ राहणारे  व न्यायाची खात्री, ग्वाही देणारे बनावे !! जर एखाद्या गटाच्या शत्रूत्वाने तुम्हाला इतके  प्रक्षोभिक (उकसू ) नयेत की तुम्ही न्यायापासून विमुख (दूर) व्हाल, तरीही न्याय करा. हे तुमच्या अल्लाहाजवळ अधिक निकटवर्तीय आहेत.अल्लाहाचे भय बाळगून कार्य करीत रहा ".

ईतका महान संदेश देणाऱ्या  पवित्र कुरआन हे रक्तपातास - कोणत्याही प्रकारचे अतिरेक  करण्यासाठी बिलकुल उत्तेजन देत नाही .  

यावर खास पवित्र कुराण म्हणते की," तुम्ही अल्लाहाच्या मार्गात त्या लोकांशी लढा, जे तुमच्याशी  लढतात,परंतु मर्यादांचे उल्लंघन (अतिरेक) करू नका, अल्लाहाला मर्यादांचे उल्लंघन करणारे आवडत नाहीत. (पारा न.१,अल- बकराहा,आ.नं.१९०),

जिहाद म्हणजे सर्व सामान्य लोकांच्या डोक्यात फक्त मुस्लिम- मुसलमानच येतात की , ते  हुकूमशाही पद्धतीने, रक्तपात , खुन,सतत लढाया, मुंडकं उडवणं, कत्तली करणं, माता- भगींनींची आब्रु घेणं, मारामाऱ्या ,  सतत युद्ध वगैरे,परंतु सर्व  मुस्लिम विरोधी विश्व पातळीवर  वातावरण निर्माण करून षडयंत्र पेरले गेले आहेत. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून विचार केला तर,हे अगदी विरुद्ध दिशेने जात आहे,जिहाद म्हणजे युद्ध नसून सत्कृत्याचा - दृष्टकृत्याविरोधी , सत्याचा- असत्याविरोधी,जुलूम करणाऱ्या विरुद्ध ,अन्यायाविरुद्ध ,अत्याचार करणाऱ्या विरोधी, हुकूमशाही विरोधी,विरूद्ध लढणाऱ्यांचा आवाज उठवणाऱ्यांचा  लढा होय...!

तसेच खास बाब म्हणजे  आपल्या मनातील शैतानी भावना, प्रवृत्ती,मनोवृत्ती ,  विकृतीवर लढा होय. आपल्यामधे चांगले काही निर्माण व्हावं,चांगली विचारसरणी निर्माण व्हावी यासाठी एक प्रयत्न म्हणजे जिहाद होय.

ज्या जमातीवर,अत्याचार होत असेल तर त्या अत्याचार करणाऱ्यावर आवाज उठवण्यासाठी जिहाद करणं होय, एखाद्या हुकूमशाही राजा विरूद्ध आवाज उठवणं याला जिहादच  म्हणतात,एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल,तिच्या अब्रू, इभ्रतीवर - अतिक्रमण होत असेल तिथे धाऊन जाऊन तिचे रक्षण करणे,शेजारच्याला कोणाकडून काही त्रास दिला जात असेलतर त्यासाठी धाऊन जाणे आणि त्याचे संरक्षण करणे हे देखील जिहादच .!!.

जे जे अल्लाहाच्या सांगितलेल्या सत्कर्माच्या मार्गावर सर्वस्व अर्पण करतो ..परंतु प्रेषीत मुहम्मद स्व.सांगतात की," संयम बाळगणे,आपल्या वाईट कृत्यांना आवर घालणं म्हणजे सर्वाधिक योग्य जिहाद कारण,म्हणजे अल्लाहा संयम करणाऱ्यांना पसंत करतो ".

मित्रांनो,बंधुंनो जिहादवर जेवढं अभ्यास करता येईल तेवढे प्रयत्न करीत जिहाद समजून घेण्याची आजच्या काळातील परिस्थिती नुसार गरज आहे.आशा समाजोपयोगी, लोक कल्याण करण्यासाठी दोष भावणेतुन "  जिहादी " संबोधित असेल तर  ;  त्याला काय म्हणावं , ती  एक जिहादची सत्वपरीक्षाच  असेल.. समजलं तर ठीक...

(मित्रहो, लेख आवडला तर  मित्रांना नातेवाईकांना आवश्य पाठवा, त्यांना हीं फायदा होईल ,आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा )


लेखन :- डॉ. सलीम शाहिदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशा लिटी दवाखाना 

श्रीरामपूर 

मोबाईल 9271640014..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा