Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 *उपसंपादक नुरजहा शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


फिनिक्स इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सरपंच निशांत लवंग पाटील, प्रशांत पाटील (सरपंच लवंग), प्रो. ए. के. शेख सर, प्रो. पांडुरंग कोळेकर, विशाल माने, उषा रामचंद्र ठोंबरे (मा. सरपंच गणेशगाव),रामचंद्र ठोंबरे, ॲड  गोपाळ लावंड अनील पवार सर, पालक संघ अध्यक्ष महादेव कोळेकर, उपाध्यक्ष निलेश वाघ,रणजित चव्हाण निशा ननवरे, निकिता मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नर्सरी व प्रायमरीच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य, देशभक्तीपर गीत, पारंपरिक नृत्य तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम सादर करून उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

कार्यक्रमात वर्षभरात शैक्षणिक, क्रीडा व उपक्रमांत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रो. कोळेकर सर व निशांत पाटील यांनी विध्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ शेख यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत व सातत्य यांच्या जोरावर जीवनात यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला. तसेच पंचक्रोशीतील शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून देणे हा शाळेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात हा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,गुलशन शेख,नसीमा शेख यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा ननवरे यांनी केले तर आभार नूरजहाँ शेख यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा