*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे शिवजन्मोत्सव मिरवणुकीच्या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. तसेच सनई चौघडा व टाळ मृदंगाच्या व ढोल ताशाच्या गजरामध्ये शिवजयंती मिरवणूक उत्साहाच्या वातावरणाम ध्ये साजरी करण्यात आली. त्यावेळेस मूर्तीचे पूजन विधवा माता-भगिनी व वारकरी संप्रदाय व जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार घालून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.
यावेळी सर्व महापुरुषांच्या विचारांची एक हजार पुस्तकांची वाटप करण्यात आली.यावेळी लहान मुला मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फतिमा शेख, व माता रमाई यांच्या वेशभूषेतील रणरागिनी घोड्यांवर स्वार झाल्या. यावेळी माता-भगिनींची उपस्थिती लक्षणे होती. तसेच घोडे १२आणि ५ उंटांचा समावेश होता.जेऊर आणि शेटफळ व कोर्टी येथील वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी टाळ, वीणा, मृदंगाच्या गजरात मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. रथामध्ये सजावट केलेली.आकर्षक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लक्ष वेधून घेत राहिली. हा रथ विद्युत रोशनाईने झळाळून निघाला. रथाच्या समोरील बाजूस मावळ्यांची वेशभूषा करून तरुणाईने लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीस लक्षवेधी ठरले शेटफळ (ना) येथील लेझीम पथक शेटफळ येथील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता
योद्धा करिअर अकॅडमी येथील मुलांनी व मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर व लेझीम सादर केले. शंभो वाद्य व ढोल पथक पुणे मुला मुलींनी कार्यक्रमास आकर्षक असे वाजवण्यातून सर्व शिवप्रेमींची मने जिंकली. व भैरवनाथ लेझीम पथक कोंढेज येथील ग्रामस्थांनी जुन्या पारंपरिक पद्धतीने लेझीम सादर केले. जेऊर येथील लहानमुले व मुली यांचा देखील लेझीम पथकामध्ये समावेश होता,व श्रीराम हलगी ग्रुप व गोफ लेझीम पथक तसेच बाभूळगाव येथील हलगी पथक व जेऊर व परिसरातील सर्व वारकरी सांप्रदाय यांचा सहभाग होता. महाराष्ट्र केअर अकॅडमी कुंभेज फाटा मुला मुलींची पारंपारिक वेशभूषा तसेच अंजनडोह येथील गजे ढोल व ताशा पथक सर्व पथकांनी आकर्षक अशी कला सादर केली. तसेच करमाळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्या नागरिक उपस्थित होते. व त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिवभोजनाची व्यवस्था
शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व शिवप्रेमींसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम यशस्वी केला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा