डॉ सलीम सिकंदर शेख.
श्रीरामपूर
जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर )
मोबाईल :- 9271640014
# दिव्य कुरआनात अल्लाह म्हणतात, " कोणी निर्माण केल्याशिवाय ते अस्तित्वात आलेले आहेत की काय ? की, त्यांनी स्वतःला निर्माण केलें आहे. ( सुरहा नं. 52 अत - तुर, आ नं. 35).
# दिव्य कुरआन नुसार ," ज्याने मला जन्म दिला आहे , तोच ही मला सरळ मार्ग दाखवतो # तोच मला अन्न-पाणी देतो #, आणि मी आजारी पडलो तर ; तोच मला बरा करतो ,
# तोच मला मृत्यू देईल आणि हो , मग पुन्हा तोच मला कयामतच्या दिवशी जिवंत करील # आणि ज्यांच्यापासून मी आशा बाळगतो की , तोच ( कयामतच ) च्या मोबदल्याच्या दिवशी माझी चुक माफ करील ," (दिव्य कुराण , सुराह नं.२६ , अल-अशुराह आ.नं .७८, ७९, ८० , ८१, ८२ ).
# " तोच सृष्टीचा निर्माता - रब ( पालनकर्ता ) आहे ." ( सुराह नं.१ अल -फातिहा आ.नं.१,२ ).
#" तोच चिरंतरजीवी असून , तमाम सृष्टीचा भार त्यानेच सांभाळलेला आहे , पृथ्वी व आकाशाचा स्वामी ( रब ) तोच आहे " ( सुराह नं.२ आ.नं.२५९ ).
# " समस्त सृष्टीचा स्वामी ( रब
) तोच आहे , प्रतिष्ठा प्राप्त करणारा ही तोच (रब) आहे व अपमानित करणारा ही तोच आहे " ( सुराह नं.३ आ.नं.२६ - २७ ).
# " आकाशातील चंद्र -सुर्य - तारे सर्व काही त्याचेच आहे , आणि तोच जीवन व मृत्यू देणारा आहे "( सुराह नं.१०, आ.नं.५५ - ५६ ).
#" पृथ्वी व आकाशातील गुप्त सत्यांचे ज्ञान फक्त त्यालाच आहे ,तो सर्व ज्ञानी आहे ,तो सर्व काही करु शकतो "( सुराह नं. १६,आ.नं. ७७ )
#" सृष्टीच्या प्रत्येक वस्तूला तिचे स्वरूप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा तोच आहे ". (सुराह नं.२०,आ.नं.५०).
#" चिरंजीवी व चिरस्थानी फक्त्त तोच आहे ." ( सुराह नं. २० आ.नं.११०-१११).
# " तोच सर्वत्र सर्वोत्तम उपजिविका देणारा आहै ," ( सुराह नं. २२ आ.नं.५८ व ६६ ).
#" तोच असण्याला नष्ट करतो , सत्याला खरे करून दाखवतो , लोकांची निराशा झाल्यानंतर ही पाउस पाडतो " ( सुराह नं..४२ आ.नं.२४ व ३१).
#" तोच जबरदस्त व बुद्धीमान आहे , तोच आद्य ही आहेत व अंतिम ही तोच राहाणार आहे , तोच प्रकट ही आहे व तोच अप्रकटही , व. तोच मनातील रहस्ये ही जाणणारा ,"( सुराह नं.५७ आ.नं.१ ते ६).
#"तोच वाली व दाता आहे , तोच मृतांना जिवंत करणारा (कयामतच्या दिवशी) आहेत ." (सुराह नं.४२ आ.नं.९ ).
# " तोच क्षमा करणारा ही आहे व कठोरातील कठोर शिक्षा देणारा ही तोच आहे ." ( सुराह नं.१३ आ.नं.६).
# " तरी ही तो - निरपेक्ष आहे , कोणीही त्याची संतती नाही व तो ही कुणाची संतती नाही ." पारा नं ३० सु.नं ११२ सुराह -ईखलास आ.नं.१ ते ४).
हीं सर्व दिव्य कुरआनातीलाच -आयाती -सुरहा उदाहरणासाठी दिलेली.. असें हजारो उदाहरण देता येतील.
सृष्टी वर तारकीक लक्ष दिले तर , निश्चितच आश्चर्यचकित झाल्या सारखं होतो.. सृष्टीतील प्रत्येक कण न कण , चंद्र -सुर्य - तारे , प्रत्येक घटना आपल्याला आश्चर्य चकीत , चमत्कारिक, अदभुत करुन सोडतात . सृष्टीच्या निर्मितीचा व सृष्टी चा सुनियोजित आराखडा ,रचना , पद्धती, त्यांची प्रत्येक क्षणा क्षणाची वेळेची अचुकता , आप-आपल्या ठराविक वेळी ; त्यामधे मिलीसेकंद पेक्षा हीं मिली सेकंदाचा ही फरक नाहीं, एवढी अचुकता , चंद्र -सुर्य -तारे - पृथ्वी यांच्या मधे एक मिली सेंकदाचाही फरक न होता आपल्या वेळेनुसार ऋतूचक्र - कालचक्र फिरत आहेत .
लाखों च्या संख्येने आकाश गंगा ( गॅलॅक्ससी,) आहेत , त्यात फक्त्त बोटावर मोजण्या इतक्याचं विज्ञानाने शोधून काढल्या.. त्यामध्ये काही ठिकाणी दिव्य कुरानात म्हटलेत जीव सृष्टी आहेत. ते शोध अजूनही विज्ञानाला लागलेला नाहीत.. परंतु 1500 वर्षा पूर्वी दिव्य कुरआन सांगून गेले.
अदभुत- अदुतिय चमत्कार आज विज्ञानाच्या युगात सुद्धा आपण आश्चर्यचकीत होऊन पहात असतो. जगात एवढ्या मोठ्या जनसंख्येला वेळेवर तीन वेळा पोटात अन्न , वेळेवरच पोहचत कसं असेल..
समुद्रात दिव्य कुरआन नुसार जवळपास १८००० आठरा हाजार पेक्षा ही जास्त जिव व जंतु आहेत ( कुरआननें 1500 वर्षा पूर्वी सायंन्स डेव्हलोप नसताना सांगितले ) फक्त समुद्रात . उदाहरण फक्त्त एकटा व्हेल माश्याच घेऊ, एका वेळी एक व्हेल मासा कितीतरी टन अन्न आपल्या पोटात घेतोय ,टन एका वेळेस खातो, पुन्हा दिवसात किती खात असेल फक्त एक व्हेल मासा . असे लाखों च्या संख्येने व्हेल मासे असतील तर त्यांचं हीं आदरनिर्वाह व्यवस्थित न चुकता सर्व पूर्तता होत असते, पुन्हा अनेक कोटींनी जिव व जंतु महाकाय विशाल व्हेल माशा पेक्ष्या हीं अति विशाल प्राणी जिवंत त्या सप्त महासागरात आहेत.त्याच प्रमाणे जिवंत पृथ्वीवर आहेत . त्यामध्ये प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळे , नखरे वेगवेगळे असून तो सर्वांचे नखरे नुखरे त्यांच्या सवयी प्रमाणे पुर्णपणे ओळखून त्यांना त्यांच्याच प्रमाणे अन्नधान्य व्यवस्थित पुरवतो . एक हजार फुटावर बारीक किडूक असतात, मुंग्या चे वारूळ असतं यांना हजार फुटावर हीं अन्न पुरवतोय..हें सर्व सिस्टिम बघून माणूस हैरान होत असतो .
पण सृष्टीच्या प्रत्येक जिवजंतु , प्राणी मात्रा , प्रत्येक आणु व रेणूंची साचेबद्ध रचना बनवली आहे ,ह प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध असून साचेबद्ध काम करीत आहे,
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकाला स्वतःची स्व- ओळख देऊन जन्माला घातलं आहे , प्रत्येक जिवाला एक आपलं वैयक्तिक पातळीवर विशिष्ट वैशिष्ट्य बाहल केलेलं आहे .
प्रत्येक जीवजंतू जन्माला येतात तर आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला तो जन्माला येण्याआधी त्याला उपाशी पोटी राहु नाही म्हणून येण्याआधीच दुधाची सोय पुर्ण करुन च जन्माला घालतोय.
किती अद्भूत आहे हे , त्याच बाळाला थोडं थोडं मोठं करतो आई -बाबा व समाजाच्या प्रत्येक घटकांकडून काही तरी शिकायला देतो.
जमीनीतुन एक दान्याच्या पेरणी केल्यानंतर त्या दाण्याचे रूपांतर असंख्य ( कणीस ) करून ते धान्य , प्रत्येक दाण्यांवर त्या खाणाऱ्यांचं नाव अदृष्य ठेवून बरोबर त्याच खाणाऱ्यां जवळ पोहच करुन प्रत्येकाला त्याच्या भुकेच्या वेळेनुसार पोटात घालतो . किती अद्भुत आहे ना ? विचार केला तर आश्चर्य करण्याशिवाय पर्याय नाहीच नाही.
५०,६०,७०,८०-१०० वर्ष जगून जग सोडून एक दिवस जाने आहेत , सृष्टीच्या प्रत्येक कणा - कणाला मरण हे निश्चित ,
दिव्य कुरआन म्हणतो "कुल्यु नफसून जायकतुल मौत " चराचराला मृत्यू हे अंतिम सत्य आहे . हो मृत्युनंतर तो तुम्हाला अल्लाह जीवंत सुद्धा करणार आहे ( दिव्य कुरआन मध्ये अल्लाह सांगतात ) हे सुद्धा सत्य आहे . परलौकिक जीवन म्हणतात त्याला. ते जीवन लाखों वर्षाचं आहेत अल्लाह कुर आन मध्ये सांगतात.याचं उदाहरण दिव्य कुरआन मध्ये 15 व्या अध्यायात सुरहा कहेफ मध्ये एका गुहेत 307 वर्षे झोपलेल्या सहा माणसं व एक कुत्रा कसा जिवंत केला.. याचं विस्तृत वर्णन वाचून अल्लाह ( परमेश्वर - ईश्वरा) च्या अफाट शक्तीची जाणीव होतें.
जगात केलेल्या चांगल्या- वाईट कामांचं हिशोब घेण्यासाठी...हे जीवन चक्र आहे...त्यालाच काल चक्र म्हणतात.
हें सर्व कालचक्र अदृश्य कोण तरी चालवत असतो, हें आपल्या विचार करण्या पलीकडचं आहेत.. येथे विज्ञान हीं पोहचू शकत नाहीत.. हें विज्ञानाच्या क्षमते बाहेरचे, असंख्य पटीने क्षमते बाहेर चे.
याची एक व्याख्या करताच येणार नाहीत , .
दिव्य कुरआन पारा न. १५ मधे अल्लाह सांगतात की ," हें पैगंबर (स्व.सल्लम ) ! लोकांना सांगा की , जर सात ही समुद्र हे माझ्या पालनकरत्याच्या गोष्टी लिहिण्यासाठी शाई( इंक )(लिहीण्याची) बनला तर , तो समुद्राची शाई संपेल , परंतु पालणकरत्याच्या गोष्टी संपणार नाही ; हो , इतकेच नव्हे तर पुन्हा तितकीच शाई आम्ही आणली तरी देखिल पुरेशी ठरणार नाही ," (सुराहा अल - कहफ आ..नं.१०९ ).
प्रसिद्ध भौतिक शास्रज्ञ लॉर्ड केलवीन नें म्हटले की, तुम्ही सृष्टीवर जेवढे जास्त चिंतन, मनन, संशोधन कराल, तेवढे तुम्हाला ईश्वराच्या ( अल्लाह ) च्या अस्तित्वाची अनुभूती येईल आणि तेवढ्या जवळ तुम्हीं ईश्वरा ( अल्लाह - परमेश्वर ) राच्या जवळ पोहोचाल.
बुद्धी आणि विवेकाच्या जेवढा विचार कराल तेवढ्या निष्कर्षां जवळ येऊ की, या अधभूत, अकल्पनीय अंनत अशा ब्राह्मनंड ( विश्व )चा कोण तरी एक निर्माण ( निर्मिक ) कर्ता, एक स्वामी, रचियता, आणि जबरदस्त महा शक्तिशाली महान आहे.
सारी सृष्टी ईश्वराचे अस्तित्व पुकारणारी असे वाटे,
सर्वत्र ईश्वरी चमत्कार !
सारी सृष्टी परमेश्वराचा महिमा जणू मुक्यानें गात आहे,
जिव्हा प्रत्येक पानांत !
ध्वनि प्रत्येक निरझरी सर्वत्र धूमत,
वाणी वाऱ्यावर धरेवरी निरभ्र गगनी आहे,
महान पुरामध्ये सर्वत्र ईश्वरी वाणी !
नावेक न विसावते !!
महात्मा ज्योतीराव फुले..
(मित्रांनो लेख आवडल्यास मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांना हीं फायदा होईल, प्रतिक्रिया अवश्य कळवा )
🌹" इस्लाम समजून घेताना "🌹
🌹 'माणसं जोडली पाहिजे "🌹
लेखन डॉ सलीम सिकंदर शेख.
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना
श्रीरामपूर
जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर )
मोबाईल :- 9271640014.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा