*उपसंपादक --नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित मा.शुभांगी भडभडे संस्थापित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान,नागपूर आयोजित वार्षिक साहित्य संमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार साेहळा - वर्ष २६ वे चे आैचित्य साधून लेखक इंद्रजीत पाटील यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले.त्यांच्या ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.या कथासंग्रहास श्री.राम भाेंडे व छाया कावळे सर्वाेत्कृष्ट कथासंग्रह म्हणून गाैरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.मधुकर हुजरे यांनी स्वीकारला. सदर कथासंग्रहास मिळालेला हा तेरावा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.प्रस्तुत पुरस्कार संमेलनाध्यक्ष विदर्भ प्रांत अध्यक्ष व अ.भा.साहित्य परिषद साहित्य भारती अॅड.लखनसिंह कटरे,उद्घाटक ज्येष्ठ रंगकर्मी,लेखक,दिग्दर्शक डाॅ.रंजन दारव्हेकर,निवासी संपादक,महाराष्ट्र टाईम्स,नागपूर श्री.श्रीपाद अपराजित यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार साेहळा श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह,शंकरनगर,नागपूर या ठिकाणी पार पडला.सदर कार्यक्रमाचे नियोजन पद्मगंधा कार्यकारी साहित्य समिती अध्यक्ष प्रभा देऊसकर,उपाध्यक्ष शुभांगी गान,सचिव संगीता वाईकर,सहसचिव डाॅ.स्वाती माेहरीर यांनी अतिशय सुंदर व शिस्तबद्ध केले हाेते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.स्वाती माेहरीर यांनी केले.ग्रामीण भागातील या प्रतिभाशाली व हरहुन्नरी लेखकाचे सर्वत्र कौतुक हाेत असून मा.श्री.माधवरावजी कुतवळ,जनसेवक अमाेल (भैया) कुतवळ,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा