*डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख*
*श्रीरामपूर*
*मोबाईल :- 9271640014*.
आज रमजान मुबारकचा शेवट चा 30 वा रोजा, आणि जुमूआ:तुल विदाअ: व लैलतुल जायजा ची कद्र रात्रं म्हणतात नां जगातील सर्व योग एकाच दिवशी दुग्ध- शर्करा- योग..
दिव्य कुर आन म्हणतं, " हे बांधवांनो ! जेव्हा जुमूआ( शुक्रवार) च्या दिवशी तुम्हाला अजान(पुकारले) देऊन बोलावले जाईल ; तर, तुम्ही नमाजसाठी लगेच , घाई करून आपले दुकान , व्यापार , लवकरात लवकर बंद करून या , हें तुमच्यासाठी चांगलं राहील . जर तुम्ही या गोष्टीचं महत्त्व जाणाल तर ". ( सुरहा जुमूआ आ. 9 ) . " मग नमाज जेव्हा पूर्ण होईल ; तेव्हा भूतलावर पसरले जावून ; आणि अल्लाहाच्या कृपाप्रसादाचा शोध घ्यावा,( सुराहा नं.६२ अल-जुमूआ आ. १०).
लैलतुल कद्र - दिव्य कुरआन सांगते, " आम्ही! या कुरआन ला कद्रच्या पवित्र रात्रीत अवतरले आहेत ; आणि तुम्हाला काय माहित कि ' ,कद्र ' ची रात्र काय आहे ? कद्र ची रात्र ही हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे, दूत आणि रुह जिब्रिल अलैहिससलाम.(जिब्राल्टर) त्या रात्री आपल्या पालन कत्यार्यचा आदेश घेऊन खाली उतरतात . ती रात्र पुर्णतः " शांती" ( सुरहा अल कद्र आ. नं., 1-6 ).
या जुम्माआ ( शुक्रवार) दिवस ' सरदार " आणि ईद चा दिवस, गरीब मजूर चा तो दिवस आनंद ईद सारखाच असतो म्हणून याला ईदुल जुमूआ म्हणतात.
जसं संडे ला आठवडा भरातील कामं, नखे दाढी कपडे घुवून ईसरी व्यवस्थित निगा करून आत्तर्स , शुर्मा लावून जवळच्या मशिदीमध्ये एकत्रितपणे जुम्मा नमाज अदा करत स्वकीयांना, मित्र भेटत शुभेच्छा देत खुश-आनंद घेतात. एक समाज बांधिलकी . आठवडाभर कष्ट करत एक दिवस एकत्र येत ईद सारखं आनंद होतो.
हजरत अबु-हुरैरा रजि. म्हणतात, ' प्रेषित हजरत मुहम्मद स्व.नी सांगितले की, जुमूआच्या दिवस एक क्षण असा आसतो त्या क्षण वेळेला अल्लाहा ची क्रुपा ,करूणा व बक्षिष देण्याची असते , परमेश्वराने ती वेळ निर्माण केली आहे, त्या वेळी इच्छा ,दुआ, मागणं, काही असो मागणी पूर्ण करतात. परंतु त्यांनी ही वेळ हाताच्या बोटांचा इशारा करुन सांगितले की ती वेळ फार थोडीच असते .तुम्ही दिवसभर दुआ मागा ,प्रार्थना करा ".( हादिस ).
जगाच्या निर्मितीपासून जुम्माआचे महत्त्व आहे , प्रमुख घटना जुम्माआच्या दिवशी घडलेल्या , समस्त ब्रह्मांडाची निर्मिती जुमूआच्या दिवशी झालेली, ब्रह्मांडाचे पहिले प्रेषित.पैगंबर आदम आलैहिससलाम. यांना स्वर्गात निर्माण केले (जन्म.)व नंतर त्यांना स्वर्गातून पृथ्वीतलावर पाठवले व नंतर त्यांचे महापरिनिर्वाण दिन दिवस व त्यांची हजरत हवा अलैहिससलाम (त्यांची पत्नी) बरोबरील भेट या सर्व घटना जुमूआ दिवशी च्या व अल्लाहा ने क्षमा ,दया दिली तो दिवस हा जुमूआचा.
तसेच हजरत मुसा अलै. मोजेस यांना अतिक्रुर राजा फिरऔनपासून मुक्ती (सुटका )जुमूआ दिवशीची.
प्रेषित हजरत युनुस अलै.यांना समुद्रातुन चाळीस दिवस व्हेल माशाच्या पोटातुन सुटकेचा दिवस जुमूआच.
जग प्रसिद्ध असे नुअ(नुहा) अलै.यांची नौका ( नाव ) ( प्रलयकाळा )मधील जमिनीवर टेकली तो दिवस जुमूआच.
प्रेषित.हजरत आयुब अलै. यांचे संपूर्ण शरीराला किडे लागले होते त्यापासून त्यांना मुक्तीचा दिवस जुमूआ चा.
प्रेषित.हजरत इब्राहिम अलै. यांना अतिभव्य पेटवलेल्या आगीतून सुटका मुक्ती जुमूआच्या दिवशीच त्याचं आगीचे रूपांतर फुलात झालं.
दिव्य कुरआन म्हणतात , ' पृथ्वीचा अंत म्हणजेच कयामत दिवस हा १० दहा मोहरम या दिवशी असणार तो दिवस जुमूआ च आसणार आहेत .
आज रमजान महिन्यातील शेवटचा जुमा व त्याबरोबरच अतिविशेष आज जुमूआची रात्र ' लैलातुल कद्र 'ची 30 वी पवित्र दिव्य लैलतुल कद्र रात्र, हा दुग्धशर्करा योग, जुमूआ ही लैलतुल कद्र सारखेच मानले जातात त्यालाच " यौमल जुमूआ" ही संबोधतात. रमजान महिन्यातील लैलातुल कद्र चे रात्रीचे पुण्य व शेवटच्या जुमूआ ( जुमूआतल विदाअ )चे पुण्य योग जुळून आलेला.
आज लैलतुल जायजा, अर्थात" जायजा " म्हणजे " अवलोकन " म्हणजे महीनाभर ठेवलेल्या रोजे( उपवास) चे केलेल्या खडतर प्रवासाचं (अवलोकन) जायजा करणं . खरोखरच इमानेइतबारे अपण केलेल्या महिन्याभराच्या कष्टाचं बक्षीस घेणं.
कुठल्याही गोष्टीचे प्रशिक्षण घेणे यासाठी आवश्यक आहे की, त्यात पारंगत व्हावे आणि त्याअनुषंगाने कामे सोपे व्हावीत. आपण मुख्यत्वेकरून पाहतो, शिक्षण, आरोग्य, पोलिस प्रशासन, मिलिट्री, खाजगी संस्थांमध्ये आपल्या कर्मचार्यांच्या व्यक्तीमत्वात, कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. यामाध्यमातून सदरच्या उमेदवाराची कार्यक्षमता तपासली जाते, त्याच्यात प्रशिक्षणातून होणार्या बदलाचे मूल्यमापन केले जाते आणि त्याची कार्यक्षमता वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जाता आणि त्यावरून त्याच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते.
असेच सर्वांगीण प्रशिक्षण वर्षाकाठी एक महिना ईश्वराने श्रद्धावंतांंसाठी रमजानुल मुबारक मध्ये ठेवले. मित्रानों! रमजानमध्ये महिनाभर रोजे ठेवले, कुरआन पठण केले, वाईट गोष्टीं- सवयी- व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले. शक्य तितक्या उच्चकोटीच्या नैतिकतेला प्राधान्य दिले. मित्रानों,हे काम अजून पुर्ण संपलेले नाही व नसतात देखील व हेच कार्य आम्हाला पुढील 11 अकरा महिने अमंलात आणायचे आहे. काही तत्वांना रमजामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करण्याचा कसोशीने प्रयत्न केला . आपल्याला सत्यावर चालणारे आणि वाईटांपासून इतरांनाही दूर करणारे शिलेदार बनायचे आहे.
दिव्य कुरआन सांगितले, “आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.” (सुरह नंबर ३ आ.नं. ११०)
मित्रानों ! या आयातीवरून समजते , श्रद्धावंतांना संपूर्ण मानवकल्यासाठी अस्तित्वात आणले गेले आहेत ,
रमजानच्या काळातील प्रखर प्रशिक्षणानंतर समजून येते की, आम्हाला ज्या अर्थी उन्हाचे चटके सहन करीत, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची कडक तंबी दिली गेली. वैध गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले गेले. उच्चकोटीचा संयम, धैर्य अंगी बाळगण्याचे मनोबल रमजानमध्ये मिळाले. मित्रानों, हे कठीण प्रशिक्षण ठराविक कालावधीत अर्थात संपूर्ण रमजान महिनाभर संपूर्ण जगात दिले गेले. यानंतर या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग आपल्याला मानवकल्याणाच्या हिता साठी कार्य करायचे आहे.
दिव्य कुरआन सांगते ”हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहित , आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.” ( सुरह नं १६ अल - नहल आ.न. १२५ ).
तुम्ही जर तुमच्या अल्लाहा( परमेश्वर ) ने सांगितल्या प्रमाणे या पृथ्वीतलावर मनापासून फक्त अल्लाह(परमेश्वर )च्या इच्छेसाठीच काम करीत राहिले तर नक्कीच त्यांचे चांगले फळं बक्षीस मिळते.
दिव्य कुरआन म्हणते , ” आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे निरसन, त्या भलाईद्वारे करा, जी सर्वोत्तम असेल ! तुम्ही पाहाल की, तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे. (सुरह नंबर ४१ अल - सजजदाह आ.नं.३४ ).
तुम्ही केलेल्या महीनाभरातील खडतर प्रशिक्षणाचा उपयोग तुम्हाला सर्व समाजातील लोकांना फायदा करण्यासाठी प्रयत्न करीत राहायचे आहे.. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी, त्यांना वाईट सवयी पासून दुर करण्यासाठी , त्यांना आपल्या प्रपंच चागले चालावा व आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी तत्पर राहावेत यासाठी, तुम्हाला तुमच्या सभोवताली असलेल्या सामाजिक समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या हक्कासाठी, प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून भांडणे होणार नाही यासाठीच प्रयत्न करायचं आहेत, समता बंधुता अखंडता सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचे आहे.
"बदलते वातावरण आणि आपली भूमिका "
मित्रानों! देशाचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ केले जात आहे. धर्माच्या नावावर आपआपसांत लोकांना भडकाविले जात आहे. भारतीय संविधानात प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा आहे. धर्माबाबात कोणावरही जबरदस्ती करता येत नाही.
दिव्य कुरआन ही हेच फरमावितो, ”तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म.” ( पारा नं ३० सुरह नं. १०९ ,अल- काफीरून आ.नं.१०९)
पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, ”धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे.” ( सुरह नं. २ अल - बकराहा आ.नं. २२३ )
सदरील कुरआनच्या आयातीवरून आम्हाला बोध मिळतो की, धर्मासंबंधी कुठलाही अतिरेक करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये, संवादाने एकमेकांची भूमिका समजून घ्यावी. शक्य तेवढे एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते, वाद विकोपाला जाणार नाहीत याची सतत काळजी घ्यावी. आप आपसात विसंवाद निर्माण होता कामा नयेत , आपल्या बुद्धीच्या क्षमतेने विचार करून मार्गस्थ व्हावे. समेट घडवून आणला पाहिजे.
राजकारण करायचेच असेल तर खरोखरच समाज कारण व लोककल्याणासाठी केेले पाहिजे. परंतु, त्या ऐवजी समाजात विषाची बिजे पेरली जात आहेत. अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आजचे समाजकारण राजकारण गेलेले आहेत,तर त्याला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे व जे चुकीचे चालले आहे ते रोखायची जबाबदारी सर्व समाजातील श्रद्धावंत आणि समाजधुरीणांकडे आहे. त्यांनी खरोखरच यासाठी कसोशीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे.. अल्लाहा म्हणतात प्रयत्न करणं तुमचे काम नंतर त्याचं फळ देणं हे माझं काम मी सर्वांचं मन परिवर्तन करणारा जरूर आहे.. प्रयत्न तर करून तर बघा, आजचं राजकीय पक्ष फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी समाजात विष पसरविण्याचे काम करीत असतात,
विष हे कोणासाठीच अमृत ठरत नाही . आज नाही तर उद्या ते आपला गुण दाखविण्यास सुरूवात करते.
दिव्य कुरआनमध्ये सांगितले की,
”आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील. (सुरह नं. १४ अल - इब्राहीम आ.नं. ४२ ).
पृथ्वीतलावर सुधारणा करण्यासाठी कुरआन म्हणते की, ”जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ”आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!” ( सुरह नं. २ अल- बकराह आ.नं.११. ) व हो ”सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना ते कळत नाही. ( सुरह नं.२ अल- बकराह आ. नं. १२ )."
मित्रानों, या कुरआनच्या आयाती ज्या उपद्रव माजविणार्यांविरूद्ध आहेत. कोणीही कुठल्याही समाजघटकाचे का असेना, दंगे, उपद्रव माजवू नका आणि जे माजवित आहेत त्यांना रोखा, आशा उपद्रवी संघटनेत सामील होवू नका. ईश्वराने प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिली आहे, त्याचा उत्तम फायदा जनकल्याणासाठी करावा.
दिव्य कुरआन सांगते की, “ ज्याने कोणा एकाला ही जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.” (सुरह नं. ५ अल- माईदा आ.नं.32).
या आयातीवरून बोध मिळतो की आपल्या हातून कधीच नाहक व्यक्तीचा खूनच काय, त्याचा हक्क ही मारला जावू नये याची खबरदारी घेतली पाहिजे.
दिव्य कुरआन फरमावते कीं, “काळाची शपथ आहे, मानव वस्तुतः तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले. ( सुरह १०३ सुरह अल - हश्र आ.नं.१ते ३ ) " .
सर्व श्रध्दावान बंधुंना विनंती की, त्यांनी दैनंदिन जीवनात दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व.मांचं मार्गदर्शन समाजात नैतिक बदलासाठी पुढाकार घेत सत्कर्माचे काम हाती घ्यावे. लोकांना वाईटापासून रोखावे, जे समाजात उपद्रव माजवत आहेत, विनाकारण सामान्य माणसांना त्रास देत आहेत, मानवकल्याणाच्या विरूद्ध जाऊन वागत आहेत अशांचा शोध घेऊन संवैधानिक मार्गाने त्याविरूद्ध लढा देण्यासाठी प्रयत्न करावा. लोकांमध्ये ईश्वरीय मार्गदर्शन पोहोचवावे. हाच संपूर्ण रमजान महिना भरातील प्रशिक्षणाचा संदेश.
मानव कल्याण करण्यासाठी सतत प्रयत्न करणं हेच रमजान महिन्यातील प्रशिक्षनाचं संदेश. आणि हेच खडतर प्रवासाचा व प्रशिक्षणाचं फलीत राहीलं...
अल्लाह( परमेश्वर भगवंत )सद्बुद्धी देवो हीच दुआ याचना करतो
" उद्या ईद उल फित्र चा दिवस अर्थात ईद चा दिवस सर्वांना सुखरूप जावो हिच अल्लाह जवळ दुआ याचना करतो "
अलविदा या माहे रमजान अलविदा:--
🌹 ईद मुबारक 🌹
( .मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर कळवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा ).
लेखन :- डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना
श्रीरामपूर
मोबाईल :- 9271640014..





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा