*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
बावडा विभागात चालू झालेल्या भारनियमना विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यानिमित्त बावडा येथील महापारेषण कार्यालयात निवेदन देऊन प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोज जगदाळे यांनी महापारेषण प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम देवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत मनोज जगदाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बावडा महापारेषण अंतर्गत येणाऱ्या गावांना सुरळीत वीज पुरवठा होत असताना मागील २-३ दिवसांपासून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शासनाचे कोणतेही अधिकृत परिपत्रक अथवा सूचना जारी न करता बेकायदेशीर व मनमानी पद्धतीने लोड शेडींग सुरु केले आहे. यामुळे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भुरट्या चोरांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरी, घरफोडी, दुचाकी वाहनाची चोरीचे प्रमाण वाढले आहे.
तसेच इयता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचा काळ असून रात्री लोडशेडींग सुरु राहिल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारनियमन मागे घ्यावे अथवा वेळेत बदल करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा महापारेषण प्रशासनाला मनोज जगदाळे यांनी दिला आहे.
बावडा येथील कनिष्ठ अभियंता श्री घोलप यांनी निवेदन स्वीकारून सदर मागण्या संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात येईल असे सांगितले तर इंदापूर महापारेषणचे उप अभियंता श्री. गावडे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क करून चर्चा केली असल्याचे मनोज जगदाळे यांनी सांगितले. शासनाच्या सर्कुलर प्रमाणे बावडा महापारेषण लोडशेडिंग चालू ठेवते कि, ग्रामस्थांच्या रोषामुळे लोडशेडिंग बदलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निवेदनावर मनोज जगदाळे, राजू भोळे, उमेश शिंदे, रितेश जाधव, शिवतेज जगदाळे, मंगेश घोगरे, अक्षय शिंदे, राजेंद्र गिरमे, निहाल गायकवाड, सदानंद कदम इत्यादीसह व्यावसायिक, शेतकरी व शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
फोटो - बावडा येथील महापारेषणचे कनिष्ठ अभियंता श्री घोलप यांना निवेदन देताना.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा