Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १० मार्च, २०२६

रमजान मुबारक 2026 रोजा नं. 21 वां, बुधवार दिनांक 11-03-2026 विषय :- ! " एहतेकाफ व लैलतुल कद्र : मानवी मुल्यं वृद्धिंगत करण्याकरिता.

 डॉ. सलीम  शाईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा  मल्टिस्पेशालिटी दवाखाना, 

श्रीरामपूर, 

जिल्हा :- अहमदनगर.

मोबाईल . 9271640014



दिव्य कुरआन  अल्लाह सांगतात , " (1),आम्ही या ( पवित्र कुरआन ) ला कद्र च्या पवित्र रात्रीतच अवतारीत केलं आहेत, (2) तुम्हाला काय माहित, कीं, त्या कद्र च्या रात्रीचे महत्व काय आहेत ?, (3) ती( एक )कद्र ची रात्र हजार महिन्यां  पेक्षा काही अधिक उत्तम आहेत., (4), त्या रात्री असंख्य स्वर्ग इशदूत  आपल्या पालनकर्त्या ( परमेश्वर - भगवंता )च्या आदेशानुसार प्रत्येक  आदेश घेऊन पृथ्वीवर उतरतात , (5) ते पहाट होयीपर्यंत ती संपूर्ण कद्र ची रात्रं शांतता व सुरक्षिततेची रात्रं आहेत... ( पवित्र कुरआन, पारा 30 वां, सुरह नं. 97, अल - कद्र आ. नं. 01 ते 05.संपूर्ण )., 


                   आज  आपला यावर्षी चा 21वां रोजा, वीस पूर्ण होऊन, तिसरा विभाग ( अशराह )अर्थातच "जहान्नम ( नरका)तील"  नरक अग्नी पासून स्वरक्षण ".

            एहतेकाफ, रमजानच्या शेवटच्या विभागात( अशराह) त 20 व्या (विसाव्या) रात्री पासून लैलतुल कद्र ची 21 वी रात्रं विषम संख्या अर्थात "पवित्र ताक "रात्रं चालू होतें, संपूर्ण दहा दिवस 24 तास जगातील प्रत्येक   मोहल्ला,  गल्ली,गाव  शहरातील प्रमुख काही श्रद्धांवान बंधूना आग्रहाचे निमंत्रण देवून दहा दिवसासाठी,  कुणाला आपल्या फुरसतीच्या वेळेनुसार मस्जिदच्या एका कोपऱ्यात  बसून अल्लाहशी नतमस्तक होतं,24 तास नामस्मरण करण्यासाठी विनंती करतात, त्याला  "एहतेकाफ " म्हणतात.

या दिवसामध्येच 21,23,25,27,29,30 या विषम संख्येने येणाऱ्या रात्रं या लैलतुल कद्र च्या पवित्र रात्रीं असतात..ती एक रात्रं म्हणजे एक महिन्यापेक्षा हीं जास्त अशी पवित्र रात्रं, त्याचं मूल्य पुण्य शब्दातीत असतं. त्या रात्रीचं एक क्षण क्षण महत्वाचं. अनादी काळात माणसाचं वयोमान एक एक हजार वर्षाचं होतं म्हणून पैगंबर मुहम्मद स्व साहेबाना काही मित्रांनी प्रश्न विचारलेतं की पूर्वीच्या आमच्या काही पूर्वजांनी एक हजार वर्षे अल्लाह चे नामस्मरण करून तेवढे पुण्य मिळवलं, तर, आमचे सध्याच्या लोकांचं आयुष्यमान फार कमी आहेत तर तेवढ्या पुण्य कमवण्याची आम्ही बरोबरी करू शकत नाही.. तर अल्लाह नें त्यांच्या येवढ पुण्य कामावण्यासाठी च या लैलतुल कद्र च्या रात्रीं ची संधी पैगंबर मुहम्मद स्व च्या मानणाऱ्यांना करून दिली.

                             जेवढ्या जास्त संख्येत बंधू  बसतील तेवढे चांगले असते.. संपूर्ण गाव -मोहल्ला- गल्ली  बसू शकत नाहीं, ज्यांना नामस्मरण करण्यासाठी वेळ असेल अशा श्रद्धांवान बंधूना बसवून  सर्वां तर्फे जगाच्या शांततेसाठी- सुखरूप आरोग्य लाभावे, -सुख -समृद्धी लाभावी, प्रार्थना करण्यासाठी विनंती करतात.

  वीस दिवस झालीत काहीच प्रार्थना केले नाहीं,  अपल्या रोजच्या संसराच्या फेऱ्यात अडकून पडलो,   येणारे दहा दिवस बाकी असल्यामुळे संधी अजूनही आहे.    बाहेरील जगाचा राहाडा विसरून अल्लाह शी एकरूप  देहभान विसरून,अल्लाह च्या नामस्मरणात तल्लीन होऊन  होणं. धायमोकळून -रडून डोळ्यात पाणी आणून,  कोणाला अजानतेपनीं  बोललो असेल, एखाद्याला वेडे वाकडे बोल बोललो असेल, कुणाचे मन दुखावले असेल, अपशब्द वापरलीत असेल,  कळत- नकळत  भावना दुखावल्या असेल,  स्वतः मध्ये अहंकाराची भावना उत्पन्न झाली असेल  तर त्वरित अल्लाहशी तल्लीन होऊन माफी मागनं, माफ करणारा फक्त्त अल्लाह च आहेत.. 

काही गोष्टीमुळे  नकळत अहंकार हा येतच असतो,  आयुष्यात खूप काही गडबडी होतात.. सगळे काही संपून जातं . पैसा  संपत्ती. काहीच शिल्लक राहत नाहीं.

      पैगंबर मुहम्मद स्व. सांगतात कीं, " ज्या व्यक्तीच्या मानत तिळमात्र देखील अहंकार, मी, गर्व  असेल, अशा,  व्यक्ती स्वर्गात कधीच जाणार नाहीं ".

पुन्हा , पैगंबर मुहम्मद स्व.सांगतात,कीं, " अल्लाह( भगवंत )सुंदर आहेत ,  अल्लाह ला सौंदर्य आवडते. अहंकार हा सत्याला नाकारतो आणि दुसऱ्याला तुच्छ समजतो, " ( हदीस इब्न मसउद, मुस्लिम शरीफ ).

   कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये,  आलेला " मी , अहंकार आपल्या उन्नती साठी बाधा ठरतो, आयुष्याच्या प्रगतीला अडचणीत आनतो ,  आयुष्यात जागोजागी गडबड करीत असतो म्हाणून अहंकाराला घालवण्यासाठी आपल्या व्यस्त जीवनाचा थोडा वेळ काढून एका जागी शांत चित्त  बसून अल्लाहशी   निर्वीकार एकरूप होऊन संपूर्ण समर्पित होऊन तल्लीन होऊन दुवा प्रार्थना करा,  अंतर्मनांतील दडलेल्या प्रत्येक कवाडे, केलेल्या चुकांची मनमोकळे  उदाहरणार्थ :  खास मित्रां बरोबर  मनातील गोष्टी बिनंधास्त बोलतोय, सांगतोय अगदीच तशाच प्रकारे,  त्याच प्रमाणे  विशेष म्हणजेच आरे -कारे च्या स्वरूपात अल्लाह ( परमेश्वर - भगवंता ) शी व्यक्त होणं.  माफी मागणं  -रित्या होणं -व्यक्त होणं, रडून  धाय मोकळून रडू रडू वारंवार मागनीं करणं . अल्लाह ला राजी करणे हेच महत्वाचं.

शास्र -सायंटिस्ट सांगतात,  आपण आपल्या अंतरमनातील सर्व विसरून, तल्लीन एकरूप होऊन  जातोय, लिन होतोय,  जोर जोराने  जेंव्हा आपल्याला भान नसतं की आजू बाजूला कोण आहेत म्हणून एवढं तल्लीन होतो , त्या वेळी  सममोहित होत असतो, - स्वतःच स्वतः ला सममोहित करीत असतो, अर्थात आपल्या मनातील चुकीचं  - विचार गोष्टी - निगेटिव्ह एनर्जी  चे कालांतराने  (पॉसिटीव्ह) सकारात्मक  एनर्जी विचारा मध्ये बदल होत होत परवार्तीत ( ट्रांसफर ) होत असतात.  मनुष्य मन मोकळे होऊन एक नवीनच अनुभव  मनाला येतोय. मनुष्य ताजातावाना होत असतो.   नवीनच ऊर्जा प्राप्त झाल्या सारखं वाटतं,  मोकळं झालं सारखं होवून मनातील अपराधी पानाची भावना एकदा ची कमी होते.अशा मुळे नकारत्मक विचाराचे सकारात्मक विचारात परिवर्तन होतं आणि हेच साध्य करायचं असतं. 

 दहा दिवसाच्या लैलतल कद्र च्या रात्रीचा जरूर फायदा उचला..

(मित्रांनो लेख आवडला तर मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य नोंदवा )


लेखन :- डॉ. सलीम  शाईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा  मल्टिस्पेशालिटी दवाखाना, 

श्रीरामपूर, 

जिल्हा :- अहमदनगर.

मोबाईल . 9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा