*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील जिल्हा परिषद शाळा नंबर २ मुले व जिल्हा परिषद शाळा नं.३ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्याच बरोबर हा सप्ताह महिला सक्षमीकरण सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला आहे.
होता साऊ तुम्ही म्हणून आहोत आम्ही या भावनेप्रमाणे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करत महिला सक्षमीकरण सप्ताहाची सांगता करण्यात आली.आज जि प शाळा २ मुले व जि.प.शाळा नं.३ मुली या ठिकाणी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापिका सुकुमारी अंगुले मॅडम व सर्व शिक्षकांनी सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन केले सर्व सहकारी शिक्षक बंधूं पांडुरंग मोहिते,दत्तात्रेय गायकवाड,तय्यब शेख,श्रीकांत राऊत,समीर कोरबू यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून व आपल्या मनोगतातून सर्व महिलांचा सन्मान केला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा