*डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख*
*बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी* *दवाखाना , श्रीरामपूर*
*मोबाईल :- ९२७१६४००१४*
दिव्य कुरआन सांगतो ," जे लोकं श्रध्येचा अंगीकार करून सत्कर्म करतात , नमाज कायम ( नित्य प्रार्थना )आदा करतात , रोजे ठेवतात , व , जे काही त्यांना (धन, दौलत पैसा ,इत्यादी .) दिलेलें आहेत त्यामधून दानधर्म करतात ( जकात देतात) ते खरेखुरे श्रद्धांवान बांधव आहेत , अशा लोकांचा मोबदला निश्चितच त्यांच्या पालनकर्त्या कडे आहे. आणि हेच लोक कयामतच्या ( प्रलय काळाच्या ) दिवशी प्रत्येक यातने पासून दूर राहतील , ( सुरहा. नं.२ अल-बकराह आ.नं. २७७)
जगातील प्रत्येक देशात वर्षभराचा त्या देशाच्या परिस्थिती व कायदयानुसार ठरवलेला टॅक्स भरावा लागतो , त्यातूनच देशातील बहुतेक आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक गरजा पुर्ण करण्यासाठी देशाच्या आर्थिक बाजू सांभाळून ठेवऱ्यांनी काही काही प्रमाणात अनिवार्य केलेला असतो.प्रत्येक देशाच्या आर्थिक गरजेनुसार टॅक्स ची वेगवेगळे प्रमाण असतात.इनकम टॅक्स( कर ), महसूल कर,वृक्ष कर, सैनिक कर( सुरक्षा ). पाणी कर, काही आणीबाणी च्या परिस्थिती नुसार अतिरिक्त कर प्रणालीची तरतूद की केलेली असते. आपल्या महाराष्ट्रीयन बोली भाषेत त्याला टॅक्स किंवा कर संबोधित असतात.
समाजातील अर्थिंक दृष्ट्या सक्षम व्यक्तींला त्याच्या अतिरिक्त संपत्तीतून दरवर्षी कमीत कमी 2.5% अडीच टक्के hiss🌷समाजातील वंचित, निराधार, दीनदुबल्या, आणि गरजु लोकांच्या उध्दारासाठी खर्च करणे अनिवार्य केले आहे. याला जकात म्हणतात.
इस्लामी धर्म शास्र प्रमाणे, तुमच्या कडे एक वर्षे होऊन तुमच्या कडे साढे बान्न (52-50 ) तोळे चांदीच्या किमती व साडे सात (7.5)तोळे सोन्या एवढी किंमत तुमच्या घरात शिल्लक असेल तर तुम्हीं " जकात " देण्याच्या कुवतीचे होतात.
आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचा टॅक्स आपल्याला अल्लाह च्या आदेशानुसार गरीब गरजूना दान देवून वर्षातून एकदा भरावाच लागतो. याच अल्लाहच्या टॅक्स ला "जकात " म्ह्टले जाते.
दिव्य कुरआन म्हणते की ,'" हे पैगंबर स्व.! तुम्ही यांच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुद्ध करा , आणि सदवर्तनाच्या मार्गात यांना पुढे करा , यांच्यासाठी कृपेची दुआ करा कारण तुमची दुआ यांच्यासाठी फार महत्त्वाची ठरेल ."( सुराहा. नं.९ अत -तौबा आ. नं. १०३).
दिव्य कुरआनात ८२ वेळा " जकात ( टॅक्स हा शब्द फक्त्त समजून घेण्यासाठी वापरलेला आहेत )आदा. करण्याबद्दल आयाती (स्लोक ). आलेले, यावरून इस्लामी अर्थव्यवस्थेत ' जकात ' चे अनन्य साधारण महत्व हे समजून येते.
' जकात ' या शब्दाचा शाब्दिक अर्थ ' पवित्रता' व ' वृद्धी ' ( ग्रोथ ) असा . म्हणजेच पहिला जो अर्थ आहे " पवित्रता ' यानुसार तुम्ही जे पवित्र जकात देण्याचे कर्म करतात त्यामुळे तुमचा माल अल्लाह ( परमेश्वर ) ला देऊन शुद्ध होतं, भारतीय टॅक्स भाषेत तुमची मालमत्ता शुद्ध , व्हाईट होवून तुमचं दान शुद्ध झाल्यामुळे तुम्हीं दान देण्यास प्राप्त झालास . जे धन असेल ते पवित्र ,शुद्ध होते . ' वृद्धि ' ( ग्रोथ )होतच असते.
जकात आर्थिक विषमता दूर करण्याचे सर्वात मोठं साधन आहे. खास गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की माणूस जेवढा दानी असतो त्याला सर्व जग आपलंसं करतं, जगातील गरिबांची दुआ.,पुण्यं भेटतं. कालांतराने दानशूर लोकांची आपसूक सर्व स्तरावर वृद्धीच होऊन त्यांचे समाजातील स्थान उच्च होतात . त्यांच्याकडे लोक आदरयुक्त भावनेने पाहिलं जातात पाहतात . काही श्रीमंत लोक पैसा गडगंज असून देखील दान देत नाहीत, संपत्ती गोळा करून साचून ठेवतात ते दान देत नाहीं अशा श्रीमंतांना समाजात काडीचीही किंमत नसते.त्यांना काहीतरी वेगळ्याच दृष्टीकोनातूनच बघितलं जातं. जकात व्यक्तिमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करते. धनाचा संचय एकाच ठिकाणी न होता पैसा समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचावावं व सर्वांगीण विकास व्हावं हा उद्देश.
पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात "जकात दिल्यावर तुमच्या संपत्तीमध्ये वृद्धी होऊन , तुमच्या कुठल्याच गोष्टीवर नैसर्गिक आपत्ती येत नाहीत ,आणि, तुम्ही कधीच नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरणार नाहीत , व , तुमच्यावर ईश्वरी प्रकोप होणार नाहीत .व बरबाद होणार नाहीत , तुम्ही हे लक्षात ठेवा. " ( हादिस :- तबराणी ).
जो माणूस समाजात सेवा करतो,. दानधर्म करतो, गरिबांचे पीडितांचे दुःख जाणून त्यांच्या गरजेला काम येतो , समाजातील दीन- दुबळे - आंधळा- अनाथ - विधवा -पीडित- समाजातील गरजू लोकांना गरजेला कायम पुढे असतो, तर, आशा व्यक्ती चे समाजात अदर्श स्थान निर्माण झालेले असते. नकळत प्रत्येक व्यवहार वृद्धिंगत होत असतात. आपल्या समाजात अशा व्यक्तींचे निरीक्षण करून पाहिले तर लक्षात येईल .
उदाहरण द्यायचं, आजच्या रमजान ईद च्या दिवसापासून ते पुढील रमजानच्या रोजा पर्यंत किंवा आजच्या तारखेपासून ते पुढील आजच्याच तारखेपर्यंत, एक वर्ष पूर्ण झाल्या वर जेवढी रक्कम , सर्व गरजा भागून शिल्लक- नफा राहिल त्यावर त्यातूनच २.५% अडीच टक्के रक्कम हीं " जकात " असते. मग ती स्त्री असो , वा पुरुष असो, किंवा, त्याच्याकडे साडे ५२.५ तोळे चांदी किंवा ७.५ साडेसात तोळे सोनं असेल किंवा त्या चांदी किंवा सोने एवढी किंमत असेल , ती वर्षभरा पर्यंत असेल तर त्यावर अडीच टक्के२.५% रक्कम ही जकात असते .ती रक्कम तुमच्या सध्याच्या बाजारभावानुसार किंमत असेल त्याच्या अडीच टक्के रक्कम जकात म्हणजें अल्लाचे टॅक्स
अनिवार्य (कंपल्सरी) सक्तीचे असते ,ते द्यावाच लागेल , नाही तर आल्लाहा (परमेश्वरा )जवळ गुन्हेगार अपराधी ठरतात . प्रॉपर्टी व्यवसाय असेल ,शेती असेल , शेती निसर्गाच्या पाण्यावर आधारित असेल अशा शेतीवर जकात अनिवार्य आहे , जो तुमच्या हलाल (कष्टाच्या ) कमाईतून, व्यवसायातून ,कष्टाच्या बळावर तुम्ही मालमत्ता जमवली तर तुम्हाला जकात अनिवार्य आहे , हरामाच्या पैशातून जकात देता येणार नाही .
दिव्य कुरआन म्हणते की,"; जर तुम्हीं अल्लाहला उदारता पुर्वक उत्तम कर्ज देणारे असतील तर , तो (अल्लाहा - परमेश्वर ) त्यात तुम्हाला त्याच्या कैकपटीने वाढ करेल, आणि अल्लाहा तुमच्या चुका माफ करेल, अल्लाह हा आपल्या दासा प्रती फार सहष्णू आहेत. ( सुरहा नं. ६४ ,अत - तगाबून, आ.नं. १७ ).
अल्लाहा स्वतःसाठी थोडं कर्ज मागतात , त्यांना काय? कर्जाची गरज? . हे कर्ज जे आपल्या कष्टाच्या कमाईतून स्वतःचा प्रपंच, घर संसार चालवून कर्ज बाजारी होतात , याच कष्टाच्या कमाईतून त्यांची उपजीविका पूर्ण होत नाही , त्यांची कर्जबाजारी होऊन हीं पूर्तता पूर्ण होतं नाहीत. किंवा , कष्ट करण्याची शक्तिच शरीरात नसते , कुवतच शरीरात राहत नाही . प्रपंच्याचा खर्च जास्त असू शकतो, आजारी पडले असेल तर त्या उपचारासाठी दोन पैसे कोणाकडून तरी कर्ज घेतलं असेल ते फेडावयाचे , सावकाराकडून कर्ज घेतं कर्जबाजारी झाले व सावकाराकडे काही गहान ठेवलं असेल, तर, अशा परिस्थितीत दारिद्र्य झालेल्या पीडिताला दरिद्री गरीबी परिस्थिती सावरण्यासाठी ,.आल्लाहाने जकातीची सोय केलेली आहेत.
थोडेच दिवस शिल्लक आहेत म्हणून लवकरात लवकरच जकात अदा करून गोरगरीब पीडित हीं लवकर आपल्या गरजेचं वास्तू घेऊन ईद साजरी करतील....
लेखन :- डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख,
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना ,
श्रीरामपूर.
मोबाईल :- ९२७१६४००१४





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा