*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
पुणे जिल्ह्यातील २२०० केंद्रात सर्वोत्कृष्ट शासकीय संगणक केंद्रात शिक्षण घेवून मुलींनी आपल्यामध्ये नोकरीची संधी निर्माण करावी असे प्रतिपादन इंदापूर तालूका मुख्याध्यापक संघाचे सचिव चंद्रकांत कोकाटे सर यांनी केले.
नीरा नरसिंहपूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चैतन्य विद्यालय व सु. गो. दंडवते कनिष्ठ महाविद्यालय व ॲम्बिशन व्हेंचर संगणक शिक्षण संस्था बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने संगणक लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यवाह श्रीकांत दंडवते, खजिनदार मगनदास क्षिरसागर, मुख्याध्यापक गोरख लोखंडे, आशिष नायकुडे, सचिन कदम, अनंत पाटील, बळीराम गलांडे, समाधान शेंडगे, अंकुश लावंड, तात्या कांबळे, सोमनाथ कोळी, घुमरे सर, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
संस्थेचे कार्यवाह श्रीकांत दंडवते म्हणाले, संस्थेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देवून स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकावा यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यासाठी सिएसआर फंडातून संगणक मिळवून देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देवून त्याचा लाभ शासकीय नोकरी करीता व्हावा असाच आमचा प्रयत्न राहणार आहे.
आशिष नायकुडे म्हणाले, संस्थेतून आतापर्यंत साडेआठ हजार विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. संस्थेची स्थापना २००४ साली होवून २०१४ साली राज्यात तीसरा क्रमांक मिळाला आहे. त्यानंतर सलग सातवेळा पुरस्कार मिळालेले आहेत. राज्यात ७६००, जिल्ह्यात २२०० सेंटर असून आपला आठवा नंबर आहे. याची शाखा नरसिंहपूर व पिंपरी बुद्रुक येथे आहे. दहावी, बारावी नंतर विद्यार्थ्यांची शिक्षणाची दिशा ठरवण्याचे काम संगणक शिक्षणातून होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष नायकुडे यांनी सूत्रसंचालन अंकुश लावंड यांनी तर आभार गोरख लोखंडे यांनी केले.
फोटो - नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व सु. गो. दंडवते कनिष्ठ महाविद्यालय संगणक लॅबचा शुभारंभ करताना.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा