उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
टेंभुर्णी,ता.माढा येथील काव्यपुष्पांजली मंडळ आयोजित माय - बाप स्मृती साहित्य पुरस्काराने कवी इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.त्यांच्या ' कळ पाेटी आली आेठी ' या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला हाेता.ताे शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व राेख रक्कम देऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.या प्रसंगी उध्दघाटक म्हणून सरपंच साै.सुरजाताई बाबाराजे बाेबडे,उपसरपंच साै.राजश्री सतीश नेवसे ,प्रमुख अतिथी मा.श्री.प्रा.डाॅ.शिवाजी शिंदे,प्रा.डाॅ.हमीद आवटे,मा.श्री.विजयभैया देशमुख,संजय वाघ,प्रा.फरीदा आवटे,रामचंद्र ईकारे,भास्कर बंगाळे,अरूण कटारे,गणपत जाधव,राजेश पवार,अंकुश गाजरे,साै.संध्या धर्माधिकारी,साै.विमल माळी,साै.शशिकला गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती हाेती.प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.याेगीराज वाघमारे यांच्या व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराने कवी इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन माय - बाप साहित्य पुरस्काराचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध लेखक मा.श्री.हरिश्चंद्र पाटील व त्यांचे सहकारी श्री.किरण निकम यांनी पुष्पक मंगल कार्यालय,करमाळा चाैक,टेंभुर्णी याठिकाणी उत्तमरित्या केले होते.त्यानंतर बहारदार कविसंमेलनाच्या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त कवी इंद्रजीत पाटील यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.ग्रामीण भागातील या हरहुन्नरी व प्रतिभाशाली साहित्यिकाचे सर्वत्र काैतुक हाेत असून मा.श्री.माधवरावजी कुतवळ,पंडितराव लाेहाेकरे,अमाेल कुतवळ,चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा