*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
मुलांना शिकवणे शिकून मोठे करणे हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे ते पार पाडतात पण त्याबरोबर चांगले संस्कार करणे हे आवश्यक आहे त्यातून देशाची संस्कारी त पिढी तयार होते शहरातील श्री कमलादेवी कन्या विद्यालयातील शिक्षण हे त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे मत करमाळा पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तर उदय बंडगर यांनी बोलताना व्यक्त केली
विद्यालयातील मुख्याध्यापिका शेलार यांच्या सेवानिवृत्ती समारंभ व विद्यालया कॉम्प्युटर प्रिंटर भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते विद्यालयातील विद्यार्थिनी साठी पोस्ट कार्यालय तर्फे आधार कार्ड तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबवल्याबद्दल त्यांचा विद्यालयातर्फे संस्थेचे अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटी विश्व विद्यालयातील विद्यापीठाचे सदस्य अनिल वळसंगकर तसेच तहसीलदार शिल्पा ठोकडे हे उपस्थित होते
सदर कार्यक्रमास नगरसेवक दीपक चव्हाण नगरसेवक सचिन गायकवाड संजय घोरपडे यांच्यासह संस्थेचे संचालक तसेच प्रतिष्ठित व्यापारी प्रतीक दोशी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहशिक्षक तृप्ती ठिगळे यांनी केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा