*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
मागील संपूर्ण महिनाभर रमजानचे रोजे केल्यानंतर 31 वा दिवस म्हणजेच हिजरी सनानुसार शव्वालच्या एक तारखेला रमजान ईद साजरी केली जाते त्या अनुषंगाने अकलूज येथील नीरा नदी काठी असलेल्या भव्य इदगाह मैदानावर अकलूज आणि परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईदचे नमाज अदा केली
प्रारंभी हाफिज झाकीर हुसेन सहाब यांनी ईदची नमाज अदा करून प्रवचन केले तर खुत्बा जनाब रमजान मदारी यांनी दिला
याप्रसंगी बोलताना हाफीज जाकीर हुसेन म्हणाले की आपला देश म्हणजे समता ,एकता बंधुत्वाचे प्रतिक असून जगात आपल्या देशासारखी एकता कोठे दिसून येत नाही सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांच्या उत्साहात सहभागी होऊन शुभेच्छा देतात ही आपल्या देशाची संस्कृती आहे
याप्रसंगी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर ,आमदार रणजित सिंह मोहिते पाटील ,नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, शिवतेजसिंह मोहिते पाटील नगरसेवक -विशाल मोरे विलास क्षीरसागर ,पृथ्वीराज अंबुरे नाशिक आबा सोनवणे, नगरसेवक योगेश गांधी मोहसीन शेख अजहर शेख , तसेच लालासाहेब आडगळे आदी मान्यवर उपस्थित होते
या. ईद निमित्त ईदगाह मैदानावर आल्यानंतर ईदची नमाज पडण्यासाठी समाज बांधवांना खडबडीत जाग्यामुळे त्रास सहन करुन असुविधेचा सामना करावा लागत आहे गेली अनेक वर्ष अशाच खडबडीत जागेत समाज बांधव नमाज अदा करतात त्यामुळे समाजात एक निराशा जनक भावना निर्माण झाली होती मात्र आमदार उत्तमराव जानकर आणि उपनगराध्यक्ष- शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी ईदगाह मैदानात सोयी सुविधा आणि सुशोभीकरणाचे आश्वासन दिल्याने समाज बांधवात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालेअसुन समाजाच्या आशा पल्लवीचे झाले आहेत
अकलूज नगर परिषदेने मागील आठवड्यात ईदगाहाची रंगरंगोटी केली मात्र ती अर्धवट केली असल्याने ईदगाह चे मिनार आहेत असेच असून त्याची रंगरंगोटी केली नसल्याने समाजात नाराजीचा सूर दिसून येत होता तोंडाला पाणी पुसण्याची काम नगरपरिषदेने केले असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे आगामी काळात या इसगाह मैदानाचे सुशोभीकरण करून खडबडीत जागेत पेविंग ब्लॉक बसवावे अशीही मागणी समाज बांधवातून होत आहे.होत आहे
या रमजान ईद प्रसंगी मागील गेली 32 वर्ष रमजानचे रोजे करत असलेले हिंदू बांधव "सुरेश भाऊ गंभीरे "यांचा यावेळी अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला
या ईद निमित्त अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने चूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा