*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
गुन्हे शाखेच्या युनिट ७ मिळालेल्या माहितीनुसार बोल्हाईमाता मंदिराचे जवळ, केसनंद वाडेबोल्हाई रोडलगत, टेकडीचे बाजुला मोकळ्या जागेत सापळा रचुन बातमीमधील कारचा कसोशीने शोध घेवुन स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून कारची झडती घेतली असता कारचे डिक्कीमधून बारदान चार पोत्यामध्ये गांजा वेगवेगळ्या २९ प्लॅस्टिक बॅगमध्ये गुंडाळलेल्या पाकीटामध्ये ५८.५८ किलो गांजा हा अंमली पदार्थ व स्विफ्ट कार असा एकूण १७,००,०००/-रु कि मुद्देमाल जप्त करण्यात आला
सदर कारमधील चार इसम नामे १) भिवा कालिदास वाघमोडे, वय ३६ वर्षे रा. मु.पो. धायखिंडी, ता. करमाळा जि. सोलापुर, २) विष्णु भागवत वाघमोडे, वय २८ वर्षे, रा. मु. पो. धायखिंडी, वाघमोडे वस्ती ता. करमाळा जि. सोलापुर, ३) हरि श्रीपती ढवळे वय ३२ वर्षे, रा. श्रीदेवीचा माळ, ता. करमाळा, जि. सोलापुर, ४) मनोज अनिल सुरवसे, वय २९ वर्षे, रा. भवानीपेठ शिवाजी पुतळ्यामागे, धायखिंडी ता. करमाळा जि. सोलापुर यांचेकडे सदर गांजाबाबत चौकशी करता त्यांनी तो गांजा पुणे येथे विक्रीसाठी आणलेचे सांगितले.
सदरबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गु र नं ९३/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट ८ (क), २०(ब) (ii) (क) २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट नं ७ चे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, ऋषीकेश ताकवणे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे महिला पोलीस अंमलदार नेहा तापकीर, सोनाली नरवडे, प्रतिक्षा पानसरे व कीर्ती मांदळे यांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा