*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा पोलीस ठाणे पोलिसांची दमदार कामगिरी
करमाळा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने करमाळा शहरात मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जवळ बाळगत असलेल्या इसमास शिताफिने छापा टाकून त्याला ताब्यात घेवून ४४,६००/- रु चा मुद्देमाल केला जप्त
याबाबत करमाळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की
करमाळा शहर व परीसरात मॅफेडॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाचे लपून छपून सेवन चालु असलेबाबत माहीती मिळत होती परंतु सदरच्या अंमली पदार्थाचे सेवन करणारे इसम हे मिळून येत नव्हते. अनेक दिवसांपासून करमाळा पोलीस ठाणेकडील अंमलदार हे अंमली पदार्थाचे सेवन करणारे इसमांचे मागावर होत
दिनांक १०/०३/२०२६ रोजी करमाळा पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोना /९१२ वैभव ठेंगल यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत विश्वसनीय माहीती मिळाली की, रात्रौ २१/४५ वा. चे करमाळा शहरातील जीन मैदान, करमाळा येथे एक इसम मॅफेडॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जवळ बाळगलेल्या स्थितीत येणार आहे. सदर मिळालेल्या बातमीप्रमाणे जीन मैदान, करमाळा येथे गेलो असता मैदानाचे बाहेरील बंद असलेल्या गाळयाच्या समोरील पायऱ्यांवर एक इसम खाली बसलेला दिसला. सदर इसमास पळण्याची संधी न देता त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे शर्टच्या खिशामध्ये एका पारदर्शक प्लॅस्टीकच्या पिशवी मध्ये पांढ्या रंगाची पावडर मिळून आली. सदर प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ असल्याचे दिसुन आले व त्यामधील मॅफेड्रॉन (एम.डी.) चे वजन २ ग्रॅम र मिली प्रति ग्रॅम अंदाजे भाव १८,०००/-रू. प्रमाणे किंमत ३९,६००/-रू. व एक सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी A-5 5G मॉडेलचा मोबाईल जु.वा. किं.अं. ५,०००/- रु. एकुण किंमत ४४,६००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने करमाळा पोलीस ठाणेस गु.र.नं. २०९/२०२६ एन.डी.पी.एस. अँक्ट कलम ८ (क), २२ (ब), २९ प्रमाणे आरोपी नामे शाहरुख ताजोद्दीन तांबोळी वय-३२ वर्षे रा. मौलाली नगर करमाळा ता. करमाळा जि. सोलापूर याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ हा इसम नामे हर्षा काळे रा. सालसे ता. करमाळा जि. सोलापूर याचेकडून विकत घेतला असल्याचे सांगितले. सदर फरारी आरोपी याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्याचा शोध घेणेकामी पोलीस पथके नेमण्यात आली असुन सदर तपासातून आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रा., मा. प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रा., मा. अंजना कृष्णा सहा. पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रणजीत माने, सपोनि/मनोज अभंग, पोहेकॉ/१६४८ अजित उबाळे, पोहेकॉ/१५० आप्पासाहेब लोहार, पोना/११६२ मनिष पवार, पोना/९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/२५ हनुमंत भराटे, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, पोकॉ/१५२४ अमोल रंदील, पोकॉ/६६१ गणेश खोटे, पोकॉ/१२५७ अमोल पवार सर्व नेम. करमाळा पोलीस ठाणे यांनी केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/मनोज अभंग हे करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा