Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

*केम रुपांतरीत साठवण तलाव प्रकरणी भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास १२ मार्चला प्रहार संघटनेचे मंत्रालयासमोर आंदोलन*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



केम रुपांतरीत साठवण तलाव, ता. करमाळा, जि. सोलापूर या सुमारे रु. २.९४ कोटी किंमतीच्या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर व शेतकरी यांनी मागणी केली आहे.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, संभाजीनगर यांनी सदर कामास मान्यता दिली असून प्रत्यक्षात धरणास आवश्यक ग्राउटिंग न करता देयके मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस होऊनही तलावात पाणी साठत नसल्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळालेला नाही.




या संदर्भात यापूर्वी २२ ऑक्टोबर व १३ नोव्हेंबर २०२५ रोजी लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदार शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांचे देयक रोखण्याची मागणीही करण्यात आली होती. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रादेशिक जलसंधारण अधिकारी (दक्षता व गुणनियंत्रण), पुणे यांच्यामार्फत चौकशीचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र ६० दिवस उलटूनही प्रत्यक्ष पाहणी किंवा अहवाल सादर करण्यात आलेला नाही.

१६ डिसेंबर २०२५ रोजी मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, पुणे कार्यालयात २४ डिसेंबरला स्थळ पाहणीचे पत्र देण्यात आले; तरीही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने आर्थिक संगनमताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


तरीही तात्काळ उच्चस्तरीय चौकशी, अहवाल सार्वजनिक करणे व दोषींवर फौजदारी कारवाई न झाल्यास दिनांक १२ मार्च २०२६ रोजी मंत्रालयासमोर व जलसंधारण विभाग सचिवांच्या दालनासमोर महिला मोर्चा व आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवनेरी कन्स्ट्रक्शन  कंपनी विरोधात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ( सन २०२५ रोजी) ब्लॅक लिस्ट करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तरी देखील अधिकारी कुठलीही अद्याप पर्यंत दखल घेतलीली दिसून येत नाही. यामध्ये दक्षता व गुणनियंत्रण मृद व जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड, मुख्य अभियंता नितीन दुसाने, उपअभियंता चेतन कलशेट्टी ( मृद व जलसंधारण विभाग येरवडा पुणे ६ )कार्यकारी अभियंता सोलापूर राहुल क्षीरसागर, यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली आढळून येत नाही तरी त्यांचीही sit चौकशी करावी.त्यामुळे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी व संदीप तळेकर व संबंधित शेतकरी बांधवांना घेऊन १२ मार्च रोजी मुंबई मंत्रालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा